कळंब तालुक्यातील अंगणवाडीत सेविका-मिनी सेविका-मदतनीस भरती

 
x

उस्मानाबाद -कळंब तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना ग्रा.प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी सेविका/मिनी सेविका/मदतनीस या पदासाठी अटी व शर्तीनुसार भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

अंगणवाडी निहाय भरावयाच्या गावाचे नाव व पदांचा तपशील असा :-

मदतनीस-हावरगांव एक,कन्हेरवाडी दोन, अंदोरा तीन, खोंदला एक, अडसूळवाडी एक, ईटकर दोन,बोरगांव(ध) एक,गौर एक, दहिफळ  एक,खडकी एक,करंजकल्ला दोन,कोथळा एक,भाटशिरपुरा एक,देवधानोरा एक,शिराढोण दोन,आवाड शिरपुरा एक,लासरा एक,हासेगाव (शि.)एक,वाटवडा एक,खामसवाडी दोन,मोहा दोन,मंगरुळ एक,गौरगाव एक,येरमाळा एक,पूर्व लोहटा एक,अंगणवाडी कार्यकर्ती खडकी एक,बोरवंटी एक,पिंपळगाव (डो.)एक,वडगाव (ज) एक,आथर्डी एक,मिनी अंगणवाडी कार्यकर्ती ईटकूर घोगावस्ती एक.

     या भरती प्रक्रियेत पदासाठीचे अर्ज पत्र दि.19 जुलै-2021 पर्यंत प्रकल्प कार्यालयात कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) स्वीकारले जाणार आहेत,असे कळंब येथील बालविकास प्रकल्प अधिकऱ्यांनी कळविले आहे.

             

From around the web