दिलासाजनक बातमी : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या घटली 

 
corona

उस्मानाबाद -  कोरोनाच्या संदर्भात दिलासाजनक बातमी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे.  जिल्ह्यात आज १२ ऑक्टोबर ( मंगळवार) रोजी केवळ १४ कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६७ हजार २४६ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६४ हजार ८७६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १४८६ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ३२० झाली आहे.


मागील काळात झालेल्या ५६४  मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३५२ ,कोविड बरा  झाल्यानंतर मृत्यू झालेल्या १०५ आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०७ जणांचा समावेश आहे.

d

d

d

From around the web