अणदूर येथे विनापरवाना कोविड -१९ ची  रॅपिड अँटिजेन टेस्ट 

पवार लॅबवर छापा , पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल 
 
अणदूर येथे विनापरवाना कोविड -१९ ची रॅपिड अँटिजेन टेस्ट

अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे विनापरवाना आणि बेकायदेशीर कोविड -१९ ची  रॅपिड अँटिजेन टेस्ट करणाऱ्या एका लॅबवर तहसीलदार यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने छापा मारून तपासणी केलेले ४७ किट तसेच तसेच काही मुद्देमाल जप्त केला आहे. 

अणदूर येथील  पवार लॅबवर एका पथकाने छापा मारून ही  कारवाई केली  शासनाची कोणतीही मान्यता न घेता अणदूर, ता. तुळजापूर येथील संजय नरसिंह पवार यांनी त्यांच्या ‘पवार रोगनिदान प्रयोगशाळा’ येथे दि. 11.05.2021 रोजी 14.20 वा. ग्राहकांच्या कोविड- 19 या रोग निदानाच्या चाचण्या केल्या. तसेच रोग प्रसार टाळण्यासाठी रोग निदान चाचणी नमूने विहीत प्रक्रीयेने नष्ट करणे बंधनकारक असतांनाही तसे न करता कोविड- 19 च्या संसर्गाची शक्यता निर्माण होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य केले. 

अशा प्रकारे त्यांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या विविध मनाई आदेशांचे उल्लंघन केले. यावरुन प्राथमीक आरोग्य केंद्र, अणदुर चे वैद्यकीय अधिकारी- शिवलिंग नागनाथ शेटे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269, 270 सह साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम- 2, 3, 4 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सविस्तर बातमी वाचा 

From around the web