आरोग्य विभागात लवकरचं 17 हजार पदांची भरती - राजेश टोपे

नियम बाजूला ठेऊन उस्मानाबादला  वैद्यकीय महाविद्यालय दिलं (Video)
 
आरोग्य विभागात लवकरचं 17 हजार पदांची भरती - राजेश टोपे

कळंब - राज्यभरातून जवळपास 56 केडरर  च्या 17 हजार विविध पदाच्या जागा येत्या फेब्रुवारी महिन्यात गुणवत्तेनुसार घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. कळंब येथील एका खासगी रुग्णालयाच्या उदघाटन प्रसंगी राजेश टोपे बोलत होते. डॉक्टर, नर्सेस, टेकनेशीयन, वॉर्ड बॉय, अशा 56 केडररचे एकूण 17 हजार पदांची भरती प्रक्रिया लवकरचं पार पडणार आहे. त्यापैकी 50 टक्के जागांची प्रक्रिया तात्काळ सुरू केली जाणार असल्याचे आणि येत्या दोन दिवसात त्याच्या जाहिराती प्रसिद्ध केले जाणार असल्याचे देखील टोपे म्हणाले. या सर्व पदांसाठी परीक्षांच्या आधारावर नियुक्त्या केल्या जाणार आहेत.  कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरत्या या करारावर वर केलेल्या असल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार थेट नेमणूक दिली जाऊ शकत नाही. मात्र आशा कर्मचाऱ्यांना या परीक्षेत प्रतिवर्षाचे 3 गुण अधिकचे दिले जाणार असल्याची माहिती देखील आरोग्य मंत्र्यांनी दिली. या कार्यक्रमानिमित्त राजेश टोपे यांनी उपस्थितांना आरोग्य विषयक विविध योजनांची माहिती दिली. 

या कार्यक्रमाला पर्यावरण व पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार ओमराजे राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डाॅक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, आखील भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश बोधले महाराज, जीवनराव गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, संजय निंबाळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील ,डाॅ.गोवर्धन तांबारे, उपजिल्हा रुग्णालय कळंबचे वैद्यकिय अधिकारी जीवन वायदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले की, शिक्षण व आरोग्य ह्या दोन गोष्टी मुळेच शहराचा विकास अतिशय गतीने होत असतो. मिळालेल्या ज्ञानातून, कौशल्यातून चांगली आरोग्य सेवा मिळते. आरोग्यसेवा ही शहराच्या जवळ व सर्वसामान्याला परवडणारी असावी. या हेतूने महाविकास आघाडीच्या सरकारने कै. बाळासाहेब ठाकरे यांचे नावे अपघात विमा योजना सुरू करून गरजूंना तात्काळ मदत केली जाते. महाआघाडीच्या काळातच 11 कोटी 35 लाख नागरिकांचे विमा काढण्यात आले आहे, त्यासाठी दरवर्षी 1700 कोटी रूपये शासन विमा कंपनीला देय करते. म्हणून जास्तीत गरजुनी शासनाच्या आरोग्य विषयक योजनांचा लाभ घ्यावा. 

50 बेडची मागणी लवकरच पूर्ण करणार

दरम्यान, कळंब उपजिल्हाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वायदंडे यांनी रुग्णालयात 50 बेडची मागणी निवेदनाद्वारे केली होती. यावर बोलताना  राजेश टोपे म्हणले की, सद्या असलेल्या 30 बेड चे श्रेणीवर्धन 50 बेडची  मंजूरी 2017 साली मिळालेली असून ते तांत्रिक कारणांमुळे जागे अभावी बांधकाम करता आलेले नाही. परंतु लवकरच  हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन टोपे यांनी दिले. 

नियम बाजूला ठेऊन वैद्यकीय महाविद्यालय दिलं

खासदार ओमराजे निंबाळकर आणि कळंब उस्मानाबाद मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील हे वेळोवेळी माझ्याकडे उस्मानाबादला वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी येत होते, असे राजेश म्हणले. वेळेप्रसंगी ते पवार साहेबांकडे गेले. म्हणून मी सासुरवाडी असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याला नियम बाजूला ठेऊन आकांक्षीत जिल्हा ग्राह्यधरून वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली. मंजुरी दिल्याबद्दल ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांनी टोपे यांचा सत्कार केला.

From around the web