प्रा. डोलारे मारहाण प्रकरणी ५ आरोपींना सश्रम करावासाची शिक्षा

उस्मानाबाद जिल्हा न्यायालयाचा निकाल 
 
s

उस्मानाबाद - प्राध्यापक मनोज डोलारे यांना मारहाण केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश के.आर.पेठकर यांनी  ५ आरोपींना तीन वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा विविध कलमाखाली झालेली असून आरोपींनी एकत्रित भोगायची आहे.

याबाबत अतिरिक्त  जिल्हा सरकारी वकील अॅड.आशिष कुलकर्णी यांनी दिलेली माहिती नुसार दि.१६ जानेवारी रोजी मारहाणीत जखमी झालेल्या मित्रांना पाहण्यासाठी  प्राध्यापक मनोज डोलारे  व त्यांचे मित्र जिल्हा सरकारी दावाखान्यात गेले असता. त्यांना पोर्चमध्ये आडवून आरोपी  नागेश गरड, रमन जाधव, नितीन वडवले, राजा कोळी, अमोल कोळगे पाटील यांनी मारहाण केली. 

याप्रकरणी फिर्यादी मनोज भारत डोलारे यांनी  २००९ ला शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंद झाला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक अंबटवाड यांनी पुढील तापास करून या संदर्भात दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणी जिल्हा न्यायालयात  ८ ते ९ साक्षीदार तपासण्यात आले. 

यामध्ये फियार्दी मनोज डोलारे तसेच जखमी संभाजी दळवी, ओमकार देशमुख, विनायक नलवडे, दशरथ काकडे यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. तसेच वैद्यकीय अहवाल व न्यायवैज्ञानिक अहवाल तसेच अतिरिक्त  जिल्हा सरकारी वकील अॅड.आशिष कुलकर्णी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरत आरोपींनां तीन वर्ष सश्रम करावास व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.  ही शिक्षा विविध कलमाखाली झालेली असून आरोपींनी एकत्रित भोगायची आहे.
 

From around the web