सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई

 
सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. परंतु सार्वजिनक ठिकाणी वावरताना  पुरेसे सामाजिक अंतर आणि मास्क वापरणे बंधनकारक  करण्यात आले असून, मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 


कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने तसेच या कार्यालयाने वेळोवेळी आदेश निर्गमित केलेले आहेत. कोविड-19चा प्रादुर्भाव रोखण्याचे अनुषंगाने गर्दीच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे.यासाठी सर्व तहसिलदार यांनी मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी यांचेशी समन्वयाने सर्व नगरपालिका हद्दीत तसेच ग्रामीण भागात पथके स्थापन करावीत. या पथकांनी मास्क न वापरणा-या व्यक्तीविरुद्ध दंडणीय कार्यवाही करावी. गरज पडल्यास स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी, असे निर्देश दिलेले आहेत.

 उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपल्या नाकावर व तोंडावर मास्क अथवा स्वच्छ रुमाल बांधणे तसेच एकमेकांपासून वैद्यकीय निकषांनुसार निश्चित केलेले पुरेसे सामाजिक अंतर (6 फूट - 2 गज की दूरी) ठेवणे बंधनकारक असलेबाबत आदेशित केलेले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणा-या व्यक्तीवर दंडात्मक व फौजदारी कार्यवाही करणेबाबत आदेश पारित केलेले आहेत.

 कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात गर्दीच्या ठिकाणी व सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणा-या व्यक्तीविरोधात दंडणीय व फौजदारी कार्यवाही करणेबाबत तात्काळ आवश्यक कार्यवाही करावी.

जिल्हयातील सर्व तहसिलदार यांनी मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी यांचेशी समन्वयाने सर्व नगरपालिका हद्दीत तसेच ग्रामीण भागात पथके स्थापन करावीत.या पथकांनी मासक न वापरणा-या व्यक्तींविरुध्द दंडणीय व फौजदारी कार्यवाही करणेबाबत आवश्यक कार्यवाही करावी.    

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई

कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने तसेच या कार्यालयाने वेळोवेळी आदेश निर्गमित केलेले आहेत. तसेच कोविड-19 चा प्रादुर्भाव होईल. अशा प्रकारचे गैरकृत्य केल्यास अशा व्यक्तींवर करावयाच्या दंडात्मक कार्यवाहीबाबत सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, गुटखा, तंबाखू इ. तत्सम पदार्थाचे सेवन करण्यास तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

शहरात पान, तंबाखू यांचे केवळ विक्रीस परवानगी देण्यात आलेली असून सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, गुटखा, तंबाखू इ.तत्सम पदार्थांचे सेवन करण्यास व सार्वजनिक ठिकाणी धुंकण्यास मनाई असल्याने पान,तंबाखू खरेदी करणा-या ग्राहकांना सार्वजनिक ठिकाणी पान,तंबाखू इ.पदार्थांचे सेवन करण्यास व सार्वजनिक जागी थुंकण्यास प्रतिबंध करणेबाबत पान,तंबाखू विक्री करणा-या विक्रेत्यांनी आदेशात नमूद केल्यानुसार सार्वजनिक ठिकाणी मदय,पान,गुटखा,तंबाखू इ.तत्सम पदार्थाचे सेवन करणा-या तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या व्यक्तींवर तात्काळ दंडात्मक कार्यवाही करणेबाबत काटेकोरपणे प्रभावी कार्यवाही करावी, असे सूचित करण्यात आले आहे.

From around the web