उस्मानाबादेत नवाब मलिकांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारुन जाहीर निषेध
उस्मानाबाद - सन १९९३ च्या बॉम्बस्फोट घडविणाऱ्या आरोपीकडून कमी दरात जागा खरेदी करुन घेवून देश विघातक कारवायाना अप्रक्षपणे पाठींबा देणा-या व आर्थिक व्यवहार करणाऱ्या नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन पुराव्यांसह उघड झाले आहे. त्याचा उस्मानाबाद भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नवाब मलिकांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारुन तीव्र निषेध व्यक्त केला.
ज्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडविले, जे मुंबईचे मारेकरी आहेत, त्यांच्याशी मंत्री नवाब मलिक यांचे आर्थिक संबंध उघड झाले आहेत, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सविस्तर पुरावे प्रसार माध्यमातून सादर केले आहे.
सरदार शहा वली खान आणि मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल या दोघांशी केलेले आर्थिक व्यवहार आणि त्यांच्याकडून कोट्यावधींची जमीन कवडीमोल भावात कशी खरेदी केली, याचे पुरावेच त्यांनी सादर केले.
मुंबई बॉम्बस्फोटावेळी माणसांची वेदना आपण बघितल्या. भारताचा शत्रू म्हणून आपण ज्याला ओळखतो तो दाऊद, त्याची बहीण आणि तिचा फ्रंटमॅन असलेला सलीम पटेल. यांच्या कडून नवाब मलिक कुटुंबीयांनी कोट्यवधींची जमीन केवळ ३० लाखात विकत घेतली. काळा पैसा देऊन ही प्रॉपर्टी विकत घेण्यात आली.
महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्धवस्त झाला आहे त्यांना प्रति हेक्टरी रु.10000 रु मदत जाहीर करण्यात आली मात्र प्रत्यक्षात हेक्टरी 3000-3800 रु अशी मदत देण्यात आली, यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांना मागच्या 6 महिन्यापासून वेतन मिळालेलं नाही मागच्या 2 महिन्यात ३७ बस कर्मचाऱ्यांनी नैराश्यामुळे आत्महत्या केली आहे, सध्या दिवाळी सुट्टी संपल्यानंतर नागरिकांना कामाच्या ठिकाणी परत जाण्याची अडचण निर्माण झाली आहे, बस कर्मचाऱ्यांना उद्धवस्त करणारे हे आघाडी सरकार त्यांना वाऱ्यावर सोडुन निवांत बसले आहे. राज्यातील महत्वाच्या विषयांवर काम करायचे सोडून महावसुली सरकारचे मंत्री पत्रकार परिषद घेण्यातच व्यस्त आहेत. ठाकरे सरकारने नवाब मलिकाचा राजीनामा घेवून आपली पत राखावी. अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा उस्मानाबाद यांच्यावतीने या पुढील काळात आणखीन तीव्र संघर्ष करेल.
या आंदोलना वेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, नगर सेवक प्रवीण पाठक, दाजी आप्पा पवार, संदिप इंगळे जिल्हा सचिव प्रीतम मुंडे, गणेश ऐडके, गणेश इंगळगी, तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी, सुरज शेरकर, प्रसाद मुंडे ,सुजित साळुंके, सुनिल पंगुडवाले, अर्जुन पवार ,अजय उंबरे, सागर दंडणाईक, मेसा जानराव, जगदिश जोशी, भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.