तेरणा कारखान्याच्या भविष्य निर्वाह निधीचा कारखाना भाडेतत्वावर देताना अनामत रक्कमेतून देण्याची अट घालण्यात येणार 

केंद्रीय रोजगार व भविष्य निर्वाह कार्यालयाकडे दाखल प्रस्तावावर सकारात्मक चर्चा - खा. ओमराजे निंबाळकर
 
तेरणा कारखान्याच्या भविष्य निर्वाह निधीचा कारखाना भाडेतत्वावर देताना अनामत रक्कमेतून देण्याची अट घालण्यात येणार

नवी दिल्ली-  तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय रोजगार व भविष्य निर्वाह निधी मंत्रीसंतोषजी गंगावार यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत महत्वाची बैठक जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास घाडगे पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुरेश (दाजी) बिराजदार आदींच्या उपस्थित पार पडली. 

या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असुन कारखाना भाडेतत्वावर देताना अनामत रक्कमेतुन भविष्य निर्वाह निधीची रक्कम देण्याची अट घालण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव केंद्रीय रोजगार व भविष्य निर्वाह निधी मंत्री संतोषजी गंगावार यांच्या कार्यालयाकडे दिला असून  या प्रस्तावावर सकारात्मक विचार करु असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले व मंत्री महोदयांनी सदरचा प्रस्ताव भविष्य निर्वाह निधीचे केंद्रीय आयुक्त सुनिल भारतवाल यांच्या कार्यालयाकडे टिपणी टाकून पाठवला आहे. हा विषय मार्गी लागण्याची चिन्हे आता निर्माण झाल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरु व्हावा ही महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची प्रामाणिक इच्छा आहे. त्यादृष्टीने अडचणींवर मात कऱण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित पाठपुरावा करत आहोत. या कारखान्याच्या 35 हजार शेतकरी सभासदांच्या हितासाठी तसेच त्यावर आधारीत दीड हजार कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी हा कारखाना सूरु होणे ही काळाची गरज आहे. त्यातच यावेळी अत्यंत चांगले पर्जन्यमान झाल्याने ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अशा काळात हक्काचा कारखाना सुरु झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
 
या अनुषंगाने 2 फेब्रुवारी 2021 रोजी माजी केंद्रीय कृषीमंत्री, खासदार .शरदचंद्रजी पवार  यांची मुंबई येथील  सिल्व्हर ओक बंगल्यावर भेट घेतली होती. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास घाडगे पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार हे देखील  यावेळी उपस्थिती होते. तेव्हा पवार यांनी हा विषय केंद्रीय पातळीवर सोडविण्यासाठी दिल्लीला भेटण्याच्या सुचना केल्या होत्या. 

त्यानुसार आज खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास घाडगे पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुरेश  बिराजदार, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अभय चालुक्य, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिपक जवळगे यांच्यासमवेत (दि.16 मार्च) रोजी श्री.शरदचंद्रजी पवार यांची दिल्ली येथिल सहा जनपथ येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी केंद्रीय रोजगार व भविष्य निर्वाह निधी मंत्री संतोषजी गंगावार यांच्याशी बोलुन बैठकीची वेळ निश्चित करुन दिली होती. 

त्यानुसार आज दि. 17 मार्च 2021 रोजी मंत्री महोदयांसमवेत शिष्टमंडळाची बैठक श्रमशक्ती कार्यालयामध्ये पार पडली. दीड तासाच्या बैठकीत मंत्रीमहोदयांना कारखान्याचा विषय सर्व शेतकरी बांधवांच्या किती हिताचा आहे हे समजावुन सांगितल्यानंतर अडचणीतुन मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. भविष्य निर्वाह निधी विभागाचे केंद्रीय आयुक्त सुनिल भारतवाल यांना याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याच्या सुचना दिल्या. 

तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देताना अनामत रक्कमेतुन कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम जवळपास 10 कोटी रु. प्रथम अदा करण्याची अट घालण्याचा पर्याय समोर आला आहे. बँकेचे अध्यक्ष  सुरेश बिराजदार यांनी तसा प्रस्ताव केंद्रीय भविष्य निर्वाह निधी मंत्री महोदयांकडे देऊन सहमती मिळण्याबाबत विनंती केली. त्यावर  मंत्रीमहोदय  संतोषजी गंगावार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन असा प्रस्ताव केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त कार्यालयाने स्विकारल्यास हा प्रश्न लवकर निकाली निघेल अशी अपेक्षा आहे.

From around the web