प्रतिक्षाधीन यादीतील उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्‍याची कार्यवाही

 27 सप्टेंबर रोजी उमेदवारांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित रहावे
 
job

धाराशिव - : धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात आलेल्या सामाईक ज्येष्ठता सुचीतील अनुकंपाधारक उमेदवारांची प्रतिक्षाधीन यादीतील उमेदवारांना ज्येष्ठता क्रमानुसार (गट-क) पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्‍याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने अधिसुचना 1 जुलै 2010 नुसार सेवाप्रवेश नियम व अटीप्रमाणे शैक्षणिक अर्हता मुळ कागदपत्रांची तपासणी करण्याकरिता समिती गठीत करण्यात आली आहे. सामाईक ज्येष्ठता सुचीतील अनुकंपाधारक उमेदवार व अनुकंपा उमेदवारांचा प्रस्ताव सादर केलेल्या कार्यालयाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

          छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ब्लॉक नं.5 लक्ष्मी कॉलनी, छावणी रोड, छत्रपती संभाजीनगर येथील कपील संजय मगरे यांचा प्रस्ताव धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील दुग्धशाळा व्यवस्थापक शासकीय दुध योजना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय इमारत पहिला मजला, जालना रोड या कार्यालयांनी सादर केला आहे.

          धाराशिव सामाजिक वनीकरण विभाग उपसंचालक कार्यालयाने लोहारा तालुक्यातील एकोंडी येथील आशिष उध्दव घंटे यांचा प्रस्ताव सादर केला आहे. जिल्हा रुग्णालय जिल्हा शल्यचिकित्सक यांनी धाराशिव समता नगर राहणार दत्त नगर येथील रत्नदीप देवानंद घोसले यांचा प्रस्ताव सादर केला आहे. धाराशिव लघुसिंचन (जलसंधारण) विभाग कार्यकारी अभियंता यांनी बीड जिल्हा केज तालुक्यातील समता नगर केज येथील किशोर बब्रु दुनघव यांचा प्रस्ताव सादर केला आहे.

          सर्व संबंधित अनुकंपाधारक उमेदवारांना कागदपत्र तपासणीची अंतिम संधी देण्यात येत आहे. शैक्षणिक व इतर अनुषंगिक (जात/जात वैधता/ नॉन क्रिमीलेअर/ शाळा सोडल्याचा दाखला/ पदवी प्रमाणपत्र/ संगणक अर्हता व इतर आवश्यक) मुळ कागदपत्र व छायांकित प्रतीसह 27 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना विभाग येथे उपस्थित रहावे. या दिवशी कागदपत्र तपासणीसाठी अनुपस्थित राहिल्यास निवड प्रक्रियेतून आपले नाव वगळण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी कळविले आहे.

From around the web