कोकण पूरग्रस्तांना तुळजाभवानी मातेचा प्रसाद
उस्मानाबाद - कोकण तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना तुळजाभवानी मातेचा प्रसाद म्हणून २५ हजार साड्या पाठवण्यात येणार आहेत. मंदिर संस्थान समितीच्या आज झालेल्या बेठकीत हानिर्णय घेण्यात आला.
मंदिर संस्थान समितीकडे 10 ऑगस्ट 2021 पर्यंत शिल्लक असलेल्या नऊवार एक हजार आणि सहावार चोवीस हजार साड्यांचे नग आहेत. एकूण 25 हजार साड्या महाराष्ट्रातील महापूराने बांधित झालेल्या रायगड,रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वाटपासाठी पाठविण्यात येणार आहेत.
उस्मानाबाद जिल्हयाच्या दौऱ्यावर असताना 15 ऑगस्ट 2021 रोजी पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी श्री. तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या समितीस महाराष्ट्रातील रायगड,रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्हयातील पूरग्रस्तांना देवीच्या 25 हजार साड्यांची मदत पाठविण्याचे आवाहन केले होते.
पालकमंत्र्यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत मंदीर संस्थान समितीने या 25 हजार साड्यांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या या निर्णयाचे पालकमंत्री गडाख यांनी कौतूक करून मंदिर समितीचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.