उपळ्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला

 
d

उस्मानाबाद  : तालुक्यातील उपळा (मा.) येथे होणारा एक बालविवाह  उस्मानाबाद ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे  रोखण्यात आला. वधूचे वय वय 18 वर्षे पुर्ण होईपर्यंत हा विवाह पुढे ढकलत असल्याचे लेखी बंधपत्र वधु- वर पक्षाकडुन लिहून घेण्यात आले आहे. 

उपळा (मा.), ता. उस्मानाबाद येथील मुलीचा आज दि. 18 जुलै रोजी गावातच बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती पोनि-  दत्तात्रय सुरवसे यांना मिळताच त्यांनी पोउपनि- श्रीमती हिना शेख, पोहेकॉ- प्रकाश खंदारे, पोना- राजु माचेवाड, पोकॉ- प्रताप खोसे, जयश्री चव्हाण असे पथक उपळा येथे रवाना केले. यावेळी रेखा व हरिश्चंद्र वामन पकाले यांची अल्पवयीन मुलगी- सुप्रीया हिचा विवाह कारी येथील रुक्मीनी व विष्णु उत्तम लोहार यांचा तरुण मुलगा- मारुती सोबत होत असल्याचे दिसले. यावर पथकाने नमूद वधु- वरांच्या वयाची खात्री केली असता सुप्रीया हीचे वय 18 वर्षे पुर्ण नसल्याचे आढळले.

बालविवाह कायद्यानुसार वधु वराचे वय अनुक्रमे 18 वर्षे व 21 वर्षे पुर्ण असने गरजेचे असुन बालविवाह करणाऱ्या सज्ञान वधु- वरांवर तसेच बालविवाहाचे आयोजन करणाऱ्या पालक, नातेवाईक यांच्यावर गुन्हा दाखल होउ शकतो. याबरोबरच अल्पवयात विवाह झाल्यास, अल्पवयात मातृत्व प्राप्त झाल्यास ती मुलगी व तीचे अपत्य यांचा शारिरीक- मानसिक विकास खालावतो. याबाबत वधु- वर पक्षाचे व उपस्थितांचे प्रबोधन करुन सुप्रीया हिचे वय 18 वर्षे पुर्ण होईपर्यंत हा विवाह पुढे ढकलत असल्याचे लेखी बंधपत्र वधु- वर पक्षाकडुन पोलीसांनी घेउन हा बालविवाह टाळला.

From around the web