पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलन चिरडले आता ६१ जणांवर गुन्हा दाखल 

उस्मानाबादेत मच्छीमारांना मागण्या ऐवजी मिळाला पोलिसांचा प्रसाद ... 
 
s

उस्मानाबाद -   सीनाकोळेगाव धरणात परप्रांतीय मच्छीमारांना दिलेली परवानगी रद्द करुन परांडा व करमाळा तालुक्यातील स्थानिक मच्छीमारांना परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी सुरु असलेले मच्छीमारांचे आंदोलन पोलिसांनी लाठीचार्ज करून चिरडून टाकल्यानंतर आता ६१ आंदोलनकर्त्यावर गुन्हा दाखल केले केलं आहे. 

उस्मानाबादच्या मस्त्यव्यवसाय कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावर ( सेंट्रल बिल्डिंग ) शुक्रवारी जवळपास २०० जणांनी आंदोलन सुरु केलं होते, त्यातील काहींनी अर्धनग्न आंदोलन सुरु केलं केले होते. पैकी  एकाने रात्री विष घेतलं होत. त्यामुळे हे आंदोलन चिघळले होते. काल  शनिवारी पोलिसांनी हे आंदोलन  लाठीचार्ज करून मोडून काढले आहे.त्यानंतर शनिवारी रात्री आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल केले आहेत. 


कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी जारी केलेले विविध मनाई आदेश झुगारुन 1) अतुल भैरवनाथ खुपसे, रा. उपळवटे, ता. माढा 2) गणेश गजेंद्र दळवी, रा. आलेश्वर, ता. परंडा 3) हेमंत विश्वनाथ घरबुडवे, रा. मिरगव्हाण, ता. करमाळा यांसह अन्य 61 व्यक्ती यांनी दि. 03- 04 सप्टेंबर 2021 रोजी दरम्यान उस्मानाबाद येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या परिसरात व सहायक आयुक्त, मच्छिव्यवसाय यांच्या कार्यालयासमोर बेकायदेशीर जमाव जमवून त्यांच्या मागण्या सांबंधी आंदोलन केले. तसेच या आंदोलनादरम्यान अतुल खुपसे यांच्या प्रोत्साहनातून आंदोलनकर्ता- अशोक नगरे यांनी विष पिउन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावरुन आनंदनगर पो.ठा. चे पोकॉ- राम सावंत यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 114, 309, 143 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 52 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना चे कलम- 11 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web