अणदूर अत्याचार प्रकरणातील तिसरा आरोपी पोलिसांना सापडेना 

पीडित मुलीच्या कुटुंबाचे उस्मानाबादेत धरणे
 
अणदूर अत्याचार प्रकरणातील तिसरा आरोपी पोलिसांना सापडेना
भाजप महिला कार्यकर्त्यांचा पाठींबा 

उस्मानाबाद - तुळजापूर  तालुक्यातील अणदूर येथे नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी सामूहिक अत्याचार केला होता, त्यातील दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे तर एक आरोपी अद्याप फरार आहे. या तिसऱ्या आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला असला तरी पोलिसांनी त्यास अटक केली नाही, त्याच्या निषेधार्थ पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आज धरणे आंदोलन केले. त्याला भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी पाठींबा दिला होता. 

अणदुर ता.तुळजापूर येथे दि.27 जानेवारी 2021 रोजी  अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला या प्रकरणातील दोन आरोपींना अटक झाली असून, तिसरा आरोपी अद्यापही सापडलेला नाही.  या आरोपीला  लवकरात लवकर शोधून कठोर कारवाई करण्यात यावी,या मागणीसाठी आज धने आंदोलन करण्यात आले तसेच  दिनांक 15/03/2021 रोजी आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा  भारतीय जनता पार्टीच्या महिला व युवती पदाधिकारी तसेच पिडीत मुलीच्या आई-वडिलांनी दिला आहे.

आजच्या धरणे आंदोलनात  पिडीत मुलीचे आई-वडील तसेच भारतीय जनता महिला जिल्हा उपाध्यक्ष अंजलीताई वेताळे, युवती .जिल्हाध्यक्ष पुजाताई देडे, सरचिटणीस पुजाताई राठोड, देवकन्याताई गाडे. शहराध्यक्ष धनश्रीताई,तसेच युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते,प्रभाकर मुळे,पांडुरंग लाटे सर ,ओम नाईकवडी,प्रविण पाठक,सुजित साळुंखे, विनोद निंबाळकर, जीवन वाठवडे,गिरष पानसरे, दादुस गुंड व इतर सहाकरी सहभागी झाले होते. 

From around the web