परंडा : महिला अत्याचार प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे... 

चारित्र्यसंपन्न असल्याचं सिद्ध करण्यासाठी पारधी समाजातील एका महिलेला उकळत्या तेलात हात घालावा लागला... 
 

परंडा: परंडा पोलीस ठाणे हद्दीत अनुसूचित जमातीतील एका महिलेवर लैंगि क अत्याचार झाला असून त्या महिलेच्या चारित्र्यावर तीच्या पतीने संशय घेउन तीला उकळत्या तेलात हात घालण्यास भाग पाडले.  या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश  प्रभारी पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, भुम यांना दिले आहेत.

काय आहे प्रकार ? 

पारधी समाजातील एका व्यक्तीनं आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला. अशावेळी या समाजातील जातपंचायतीनं महिलेला एक परीक्षा द्यायला सांगितली. संबंधित महिलेच्या पतीनं दगडांची चूल मांडली. चुलीत आग लावून कढई ठेवली आणि कढईत तेल ओतलं. ते उकळल्यावर नवरा म्हणवणाऱ्या व्यक्तीने त्या कढईत 5 रुपयांचं नाणं टाकलं आणि उकळत्या तेलात हात घालून ते नाणं काढण्यास संबंधित महिलेला सांगण्यात आलं.या अघोरी आणि अमानुष परीक्षेचा परिणाम त्या महिलेला माहिती होता. ती गयावया करत तेलात हात घालण्यास नकार देत होती. पण आपल्या पत्नीचं चारित्र्य तपासण्यासाठी तिच्या पतीनं तेलात हात घालण्यासाठी बळजबरी केली.

पारधी समाजातील प्रथा
पारधी समाजामध्ये याबाबतची प्रथा आहे. खरे बोलत असलेल्या महिलेने देवाचे नाव घेऊन उकळत्या तेलातून नाणे काढले तर तिला काही होत नाही. ती खोटे बोलत असेल तर तिला पोळते व तेलातून जाळ निघतो असा समज पारधी समाजात आहे. त्यातूनच ठिकठिकाणी असे प्रकार घडत असतात. ‘पारधी समाजातील भावांनो-बहिणींनो, मी बायकोला तेलात हात घालायला का लावतोय हे तुम्हाला सांगतो, असे म्हणत त्याने सर्व कहाणी पारधी भाषेत बोलून दाखवली आहे. तो माणूस व पोलिस मला फक्त घेऊन गेला. काहीच केले नाही, असे बायको सांगते. तिने खरे सांगावे यासाठी हे करत असल्याचे त्याने चित्रफितीमध्ये म्हटले आहे.

कडक कारवाई करण्याची मागणी 
परंडा येथील एका झोपडपट्टीत राहणाऱ्या पारधी समाजाच्या महिलेला तिच्या पतीने चारित्र्यावर संशय घेऊन तिला तिचे चारित्र्य पवित्र असल्याची परीक्षा देण्यासाठी  तिला उकळत्या तेलात टाकलेले नाणे काढण्यास सांगितले. त्यामुळे तिचा हात भाजला असून या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. 

व्हिडीओ पाहा 

उस्मानाबाद लाइव्ह फेसबुक पेजवर 

https://www.facebook.com/osmanabadlive

From around the web