पाडोळी ते टाकळी रस्ता दुरुस्तीचे काम निकृष्ट 

 
पाडोळी ते टाकळी रस्ता दुरुस्तीचे काम निकृष्ट

पाडोळी -  उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी(आ) ते टाकळी(बें) या दोन गावाला जोडणाऱ्या डांबरी रस्त्याचे काम सुरू असतानाच दुरुस्त केलेला रस्ता उखडला जात होता, त्यामुळे रस्ता दुरुस्त केलेल्या कामावर स्थानिक नागरिकांतून प्रश्न चिन्ह उपस्थित केले  जात आहेत. संबंधित ठेकेदाराने या रस्त्यावरील अनेक ठिकाणी लहान मोठे खड्डे दुरुस्त कराचे सोडून दिले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना खड्डे चुकविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे, खड्डे चुकविण्याच्या नादात लहान मोठे अपघात ही घडत आहेत.

     यापूर्वी ही मे ( २०२०) महिन्यात पाडोळी (आ) ते टाकळी(बें) या पाच किमी रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. सात महिन्यात दुसऱ्यांदा दुरुस्ती करून ही रस्ता उखडला गेला असल्याने  आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बांधकाम विभागाने झालेल्या कामाची पाहणी करावी आणि संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी ,अशी मागणी होत आहे. 

From around the web