मुरूम रुग्णालयात अखेर ऑक्सिजन बेडची सुविधा कार्यान्वित

 
मुरूम रुग्णालयात अखेर ऑक्सिजन बेडची सुविधा कार्यान्वित

मुरूम -  मुरूम शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन बेडची सुविधा  कार्यान्वित करण्यात आली आहे सदरील सुविधा उपलब्ध करण्याच्या मागणीसाठी भाजपा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मागणी करण्यात आली होती, शिवाय  मंगळवारी दि 11 रोजी ग्रामीण रुग्णालयासमोरअन्नत्याग आंदोलनचा इशारा देण्यात आला होता. आरोग्य प्रशासनाने याची दखल घेत ऑक्सिजन बेडची सुविधा रुग्णांच्या सेवेत कार्यान्वित केली आहे.  दरम्यान कोविड रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन बेड्सची सुविधा कार्यान्वित झाले असून 11 मे पासून याचा वापर सुरू करता येणार आहे अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ वसंत बाबरे यांनी दिली आहे  

 मुरूम ग्रामीण  रुग्णालयात  २५ ऑक्सिजन बेडची सुविधा असूनही केवळ तज्ञ फिझिशिएन तसेच इतर साधन सामुग्री नसल्याने  कोविड रुग्णांच्या  उपचारासाठी रुग्णालय प्रशासन जिम्मेदारी घेत नसल्याचे दिसून येत होते तसेच रुग्णालयातील   राखीव १० जंबो सिलेंडरपैकी 5 सिलेंडर तुळजापूर  तर उमरगा येथे दोन पाठविण्यात आले होते.

येथील ग्रामीण रुग्णालयात मुरूम व परिसरातील 20 ते 25 गावातील रुग्ण उपचारासाठी येत आहेत यातील गंभीर  रुग्णांना उमरगा उपजिल्हा रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात येत आहे मात्र उमरगा येथे ऑक्सिजन  बेड मिळत नाहीत. त्यामूळे  मुरुम ग्रामीण रुग्णालयात  ऑक्सिजन बेडची तांत्रिक बाबी दूर करून सुविधा कार्यान्वित करण्यात यावी अशी मागणी दोन्ही पक्षाच्या वतीने करण्यात आली होती परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करत होते. 

राष्ट्रवादी  काँग्रेस  व भाजप कडून   रुग्णालयातील उपलब्ध ऑक्सिजन बेड सुविधा  दि 10 रोजी पर्यंत कार्यान्वित करून  रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी अन्यथा मंगळवारी दि 11 रोजी ग्रामीण रुग्णालयासमोर  अन्नत्याग आंदोलनाचा अवलंब करणार असा इशारा देण्यात आला होता . जिल्हाधिकारी व आरोग्य विभाग  यांनी दखल घेत  रुग्णालयातील ऑक्सिजन बेडची तांत्रिक बाबी दूर  करून सुविधा कार्यान्वित केली आहे सदर सुविधा दि 11 पासून उपयोगात आणण्यात येणार आहे

ग्रामीण रुग्णालयातील उपलब्ध ऑक्सिजन बेड सुविधा कार्यान्वित करण्याची मागणी केली परंतु प्रशासन दिरंगाई करत असल्याने  अन्नत्याग आंदोलन करण्याचा मार्ग अवलंबला होता तसेच आ ज्ञानराज चौगुले  आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत होते.  प्रशासना कडून आंदोलन पूर्वीच मागणी मान्य करून सुविधा कार्यान्वित केल्याने सदर आंदोलन स्थगित करत आहे

  - श्रीकांत मीणियार
जिल्हाध्यक्ष, भाजप उद्योग आघाडी


ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेडच्या सुविधा अभावी शहर व परिसरातील कोविड रुग्णाची हेळसांड होत असल्याने उपलब्ध ऑक्सिजन बेड सुविधा कार्यान्वित करण्याची मागणी करून देखील  संबंधित विभाग टाळाटाळ करीत असल्याने दि 11 रोजी पासून अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार होते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार  यांनी  आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा करत उपलब्ध सुविधा कार्यान्वित करण्यासाठी संबंधिताना आदेश देण्याची मागणी केली होती प्रशासनाने याची दखल घेतली आहे. 


- मोहन जाधव
जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

From around the web