कोरोनाचा कहर :  उस्मानाबाद जिल्ह्यात १७ मार्च रोजी ९४  कोरोना रुग्णाची भर

जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या पाचशे पेक्षा जास्त 
 
कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात १७ मार्च रोजी ९४ कोरोना रुग्णाची भर

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवार दि.१७  मार्च रोजी नव्या ९४  कोरोना रुग्णाची भर पडली तर २२ रुग्ण बरे होऊन घरी परतले.  त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५१२ झाली आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या पाचशे पेक्षा जास्त गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १८  हजार ५९ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १६ हजार ९५३   रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ५८९ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 

From around the web