कोरोनाचा कहर  : उस्मानाबाद जिल्ह्यात २१  जानेवारी रोजी ३२३ रुग्णाची भर 

जिल्ह्यात  ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १४२५
 
corona

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या  झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनासोबतच ओमायक्रॉन रुग्णसंख्येतही भर पडली आहे.शुक्रवार दि.२१  जानेवारी रोजी एकूण ३२३  रुग्णाची भर पडली. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १४२५ झाली आहे. 
 
आज  पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णामध्ये  उस्मानाबाद १०९, तुळजापूर ३२, उमरगा ६३, लोहारा ३३, कळंब १५ , वाशी ३८  भूम १० , परंडा २३ असा समावेश आहे ,तसेच दिवसभरात १६० रुग्ण बरे होऊन घरी परतले. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ७० हजार २९४  रुग्ण आढळले असून , पैकी ६६ हजार ७७४  रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत २०८५ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 


कोरोनामुळे २०८५ मृत्यू तर सानुग्रह अनुदानासाठी अर्ज आले २५१८
 
जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २०८५  असताना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी २५१८ जणांनी अर्ज केले आहेत. अद्यापही अर्ज दाखल करणाऱ्यांचा ओघ सुरूच असून हा आकडा तीन हजारांचाही टप्पा पार करू शकतो. दरम्यान, ज्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह नसतानाही त्यांचा मृत्यू कोरोनामुळेच झाला असल्याचे निदान झालेले असल्यास व तसे वैद्यकीय प्रमाणपत्रही असल्यास त्या व्यक्तीचे वारसदार अनुदान मिळवण्यासाठी पात्र आहेत. यामुळेच अर्जांची संख्या वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेत तर एकाच दिवशी स्मशानभूमित २५ ते ३० चिता जळत असताना सर्वांनी पाहिल्या. अशा मृतांच्या वारसांना थोडीशी मदत म्हणून शासनाने ५० हजार हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात २६ नोव्हेंबरला शासननिर्णय निर्गमित झाल्यापासून काही दिवसांनी ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये अर्जही ऑनलाईन करण्याबाबत निर्देश आहेत.

qw

d

d

d

d

d

d

d

d

From around the web