कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात २६ जानेवारी रोजी २६६ रुग्णाची भर
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १६४४
Updated: Jan 26, 2022, 21:06 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनासोबतच ओमायक्रॉन रुग्णसंख्येतही भर पडली आहे, बुधवार दि.२६ जानेवारी रोजी एकूण २६६ रुग्णाची भर पडली. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १६४४ झाली आहे.
,
आज पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णामध्ये उस्मानाबाद ६९, तुळजापूर १७, उमरगा ६०, लोहारा ३०, कळंब ३३ , वाशी १७ , भूम २५, परंडा १५ असा समावेश आहे ,तसेच दिवसभरात २७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ७१ हजार ७४० रुग्ण आढळले असून , पैकी ६८ हजार १ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत २०८९ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.