कोरोनाचा उद्रेक : उस्मानाबाद जिल्ह्यात १० जानेवारी रोजी १०४ रुग्णाची भर
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ४०१
Jan 10, 2022, 21:11 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनासोबतच ओमायक्रॉन रुग्णसंख्येतही भर पडली आहे. सोमवार दि .१० जानेवारी रोजी एकूण १०४ रुग्णाची भर पडली. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ४०१ झाली आहे.
सोमवारी पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णामध्ये उस्मानाबाद ३९, तुळजापूर २२, उमरगा २०, लोहारा ९, कळंब ११, वाशी ०, भूम ३ असा समावेश आहे , समाधानाची बाब म्हणजे परंडा तालुक्यात एकही रुग्ण नाही.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६८ हजार २०२ रुग्ण आढळले असून , पैकी ६५ हजार ७२० रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत २०८४ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.