कोरोना : महाराष्ट्र दिनी यंदा शाळॆत ध्वजारोहण नाही !

 

कोरोना : महाराष्ट्र दिनी  यंदा शाळॆत ध्वजारोहण नाही !

परंडा  ( राहुल शिंदे ) - कोरोना विषाणूचा फटका यंदा महाराष्ट्र दिनाला बसणार आहे. यंदा जिल्ह्यातील कोणत्याही शाळेत १ मे  रोजी ( महाराष्ट्र दिन ) ध्वजारोहण करू नये , असा आदेश जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) यांनी काढला आहे. 

महाराष्ट्र दिन  हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६०  रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे.. हा दिवस राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.  विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. परंतु  ६० व्या वर्षीच ही परंपरा खंडित होणार आहे. 

शिक्षणाधिकारी (प्राथमिक )यांनी परिपत्रक काढून 1 मे रोजी महाराष्ट्र दिन शालेय स्तरावर साजरा न करण्याबाबत.जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी (पंचायत समिती )  यांना कळवले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी दक्षता म्हणून महाराष्ट्रदिनी कोणत्याही शाळेत ( सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक /माध्यमिक व उच्च माध्यमिक ) ध्वजारोहण करण्यात येऊ नये असे आदेश सर्व मुख्याध्यापक यांना दिलेले आहेत.

From around the web