तुळजापुरात साकरतेय १०० ऑक्सिजन सह ३०० खाटांचे कोविड केयर सेंटर.!

 
तेरणा ट्रस्ट देणार डॉक्टर्स; उस्मानाबादच्या तेरणा कोविड सेंटरची क्षमता ३५० करणार

तुळजापुरात साकरतेय १०० ऑक्सिजन सह ३०० खाटांचे कोविड केयर सेंटर.!


तुळजापूर  शहर व परिसरात कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता नगरपरिषद तुळजापूर यांच्या वतीने ३०० खाटांचे कोविड केयर सेंटर उभारण्यात येत असून ऑक्सिजनची सुविधा असलेल्या १०० खाटा असणार आहेत.या सेंटर ला डॉक्टर्स तेरणा ट्रस्ट मार्फत उपलब्ध करण्यात येणार असून जिल्ह्यातील वाढता प्रादुर्भाव पाहता भविष्यकाळातील गरज ओळखून उस्मानाबाद येथील तेरणा कोविड केयर सेंटर ची क्षमता १५० खाटांनी वाढवून ३५० करण्यात येणार असल्याची माहिती आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली आहे.

तुळजापूर शहरात कोविड-१९ चा आढावा घेण्यासाठी काल आ.राणा जगजीतसिंह पाटील येथे आले होते.त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.सदर इमारत ही प्राधिकरणाच्या मालकीची असून त्यांनी भक्त निवासासाठी तुळजापूर नगरपरिषदे कडे हस्तांतरीत केली आहे.या जागेवर सुपर स्पेशालिटी दवाखाना उघडण्याबाबत नियोजन चालू आहे. मात्र कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सूचनेवरून सदर इमारत तात्पुरती कोविड केयर सेंटर साठी वापरण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला असून यासाठी जिल्हा प्रशासनाचे सहकार्य लाभले आहे.जिल्ह्यात डॉक्टर्सच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने तेरणा ट्रस्ट मार्फत यासाठी आवश्यक असणारे डॉक्टर्स देण्याचा निर्णय आ.पाटील यांनी घेतला आहे.

उस्मानाबाद येथे जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने तेरणा ट्रस्ट मार्फत २०० खाटांचे कोविड केयर सेंटर चालू करण्यात आले आहे.आपत्कालीन परिस्थिती ओढवली तर त्यासाठी १२ ऑक्सिजन खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सेंटर ला तेरणा ट्रस्टचे ५ डॉक्टर व ६ जणांचा नर्सिंग स्टाफ पुर्णवेळ कार्यरत राहणार आहेत व गरजेनुसार त्यात वाढ करण्यात येईल. मात्र जिल्ह्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता भविष्यकालीन गरज ओळखुन या सेंटर ची क्षमता १५० खाटांनी वाढवण्यात येणार असून त्यांनतर या ठिकाणी एकूण ३५० खाटा उपलब्ध असतील अशी माहिती आ.पाटील यांनी आज या सेंटरची पाहणी करताना दिली.

तुळजापुरात साकरतेय १०० ऑक्सिजन सह ३०० खाटांचे कोविड केयर सेंटर.!


काल दि.१५ रोजी आ.पाटील यांनी शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी त्यांनी शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येक नगरसेवकानी किंवा प्रभागातील जेष्ठ नेत्यांनी १५० कुटुंबाची जबाबदारी घेण्याची सूचना केली असून त्यांच्या नेतृत्वाखाली ६-७ जणांची टीम आहे.यात सर्व टीमच्या सदस्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील १५० कुटुंबाची वारंवार घरोघरी जाऊन रुग्णांचा सर्व्हे करून त्यांची तपासणी करने,जर एखादा व्यक्ती संशयीत अथवा आजारी असेल तर त्यावर तातडीने उपचार करून त्याचे विलगिकरण देखील करावे व सर्वांनी मिळून याबाबत एक कृतिकार्यक्रम आखावा व त्याची अंमलबजावणी  तातडीने सुरू करावी अशा सूचना आ.पाटील यांनी दिल्या आहेत.त्या अनुषंगाने कार्यवाही चालू केली असल्याचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी दिली आहे.

यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तहसिलदार सौदागर तांदळे, वैद्यकीय अधीक्षक श्रीमती चंचला बोडखे आदी उपस्थित होते

From around the web