सोयाबीन नुकसान : विमा कंपनीकडे ऑनलाईन अर्ज करा - आ. राणाजगजितसिंह पाटील

 
  सोयाबीन नुकसान : विमा कंपनीकडे ऑनलाईन अर्ज करा  - आ. राणाजगजितसिंह पाटील


उस्मानाबाद - मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोठा पाऊस झाल्यामुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान होत आहे. विमा कंपनीच्या माध्यमातून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणेसाठी पंचनामे होणे आवश्यक असल्यामुळे विमा कंपनीच्या Crop Insurance या अॅप वर वैयक्तिक ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील  यांनी केले आहे. 


आ. राणाजगजितसिंह पाटील  यांच्या मागील आवाहनानुसार  ८०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आतापर्यंत विमा कंपनीकडे ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यापैकी १५० च्या वर शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पाहणी करून विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पंचनामा केला आहे.शेतातील पिकांचे प्रत्यक्षदर्शी फोटो व नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे पाठविण्यात आलेली आहे. या माहितीद्वारे विमा कंपनी नुकसान भरपाई बाबत पुढील कार्यवाही करेल.


सर्व शेतकऱ्यांना पुनश्च विनंती करण्यात येत आहे कि, आपल्या शेतातील पिकांचे सरसकट मदतीच्या पलीकडे जास्तीचे वैयक्तिक नुकसान झाले असेल, तर आपण विमा कंपनीच्या Crop Insurance या अॅपच्या माध्यमातून विमा कंपनीला ऑनलाइन माहिती तातडीने उपलब्ध करून द्यावी.


ऑनलाइन माहिती भरण्यासाठी आपल्या मदतीसाठी आपल्या गावातील कृषी सहायक तसेच ग्राम पंचायतीमध्ये ही सोय करण्यात आलेली आहे त्यांचा आपण उपयोग करावा, असे आवाहनही आ. राणाजगजितसिंह पाटील  यांनी केले आहे. 


याव्यतिरिक्त काही विशेष अडचण आल्यास आपण आपले नाव, गाव व इतर माहितीसह  ८८८८६२७७७७ या नंबर वर WhatsApp मेसेज करावा.


From around the web