मदत कसली ? ही तर शेतकऱ्यांची कुचेष्टा - आ. राणा जगजितसिंह पाटील

 


 मदत कसली ? ही तर शेतकऱ्यांची कुचेष्टा - आ. राणा जगजितसिंह पाटील


उस्मानाबाद - राज्य सरकारने आज जाहीर केलेल्या पँकेजवर भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी टीका केली आहे. ही मदत कसली ? ही तर शेतकऱ्यांची कुचेष्टा  आहे. विरोधात असताना तेच मागत होते  २५ हजार आणि  आणि आता  सत्ता असताना जाहीर केले १० हजार असे म्हटले आहे. 


अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात व अभूतपूर्व नुकसान झाले आहे. कापणीला आलेली पिके आणि कापून ठेवलेली पिके दोन्ही पाण्यात भिजली आहेत.पिकांच्या नुकसानीबरोबरच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अतिवृष्टीमुळे खरवडून गेल्या आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.


मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः येऊन शेतकऱ्यांचे झालेले नुकसान अनुभवले होते. शिवाय गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली तेंव्हा त्यांनी हेक्टरी ₹ २५०००/- ते  ५००००/- मदत देण्याची मागणी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्यी आशा वाढली होत्ती. मात्र ऐरवी मिळणार्या आपत्तीच्या स्थायी आदेशा पेक्षा हेक्टरी केवळ ₹३२०० अधिक दिले आहेत.


आज सरकारने जाहीर केलेली मदत पाहून शेतकऱ्यांचा खूप मोठा भ्रमनिरास झाला असून तुटपुंजी मदत देऊन बळीराजाची एकप्रकारे कुचेष्टाच केली आहे.नुकसानीची व्याप्ती व त्यातून झालेली शेतकऱ्यांची दयनीय अवस्था व त्यासाठी सरकारने जाहीर केलेली तुटपुंजी मदत पाहता सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा जेणेकरून शेतकऱ्यांना थोडासा तरी दिलासा मिळेल, असे आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. 

From around the web