उस्मानाबादची आरोग्य व्यवस्था रुळावर आणण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करत वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करा...
Aug 1, 2020, 19:01 IST
- आ.राणाजगजीतसिंह पाटील
आ.पाटील यांनी आपल्या पत्रात कोविड-१९ च्या प्रादुर्भावाची सुरुवात झाल्यानंतर पालकमंत्री महोदयांनी घेतलेल्या पहिल्याच आढावा बैठकीत जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवस्था अपुरी असल्याने व वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने पुढील काळात जिल्ह्यातील नागरिकांना गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागेल याबाबत मी अवगत केले होते. तसेच अपुरे वैद्यकीय मनुष्यबळ व व्हेंटीलेटर सारख्या अत्यावश्यक यंत्र सामुग्रीच्या अभावाबाबत चर्चा केली असल्याचे नमूद केले आहे.
सदर बैठकीला ४ महिने उलटुन गेले असून व्यवस्था सुधारण्यासाठी इतका मोठा कालखंड उलटून गेला तरी दुर्दैवाने या परीस्थीतीत किरकोळ बदल सोडता कांहीही सुधारणा केल्या गेल्या नाहीत. आज उस्मानाबाद जिल्हयातील आरोग्य सुविधा अत्यवस्थ झाली आहे. २० लाख लोकसंख्या असलेल्या या जिल्हयात आरोग्य विभागातील चिकित्सक-१६, भुलतज्ञ-१३, वैद्दयकिय अधिकारी-४०, नर्सेस-१२८ हे पदे रिक्त असुन जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य यंत्रणेत देखील एकुण मंजुर असलेल्या ६१९ विविध स्तरावरील पदापैकी २५४ पदे रिक्त आहेत. याबाबत वारंवार पाठपुरावा करून देखील शासन स्तरावर कसलीच हालचाल होताना दिसत नसल्याचे सांगत आ.पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दि.३१ जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत असलेल्या कोविड रुग्णालयात जवळपास ८० रुग्ण दाखल होते.एक कोविड संशयीत व्यक्ती मृत पावला असता त्याच्या नातेवाईकांच त्याला वेळेत उपचार न मिळाल्याने तो दगावला व तिथे डॉक्टर व नर्स उपस्थित नसल्याने सदर घटना घडली असं म्हणणं आहे.सदर रुग्ण दगावल्याने लोकभावना तीव्र झाली व शेकडोंचा जमाव रुग्णालय परिसरात दाखल झाला होता.जर यात सुधारणा झाली नाही तर पुढील काळात अशा अनेक दुर्दैवी घटना घडतील अशी शंका आ.पाटील यांनी व्यक्त केली .
आ.पाटील यांनी जिल्ह्यातील कोविड-१९ चा वेगाने होत असलेला प्रसार व त्याला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणेला येणारे अपयश पाहता आरोग्य मंत्र्यांनीच यात तातडीने हस्तक्षेप करावा व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करून गतिमान करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण या विभागातील एक अनुभवी व कृतीशिल जेष्ठ अधिकारी तातडीने उस्मानाबाद जिल्हयाची आरोग्य व्यवस्था संभाळण्यासाठी नियुक्त करावा.जिल्ह्यात जास्तीत जास्त चिकित्सक, भुलतज्ञ, आसीयु तज्ञ व निवासी डॉक्टर यांच्या तात्पुरत्या स्वरुपात प्रतिनियुक्तीवर जिल्हा सामान्य रुग्णालय,उस्मानबाद व उपजिल्हा रुग्णालय,उमरगा येथे नियुक्त करावे.उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयातील उपलब्ध असलेले सर्व व्हेंटीलेटर व ऑक्सीजन सप्लाय सिस्टम तातडीने कार्यान्वीत करण्यासाठी संबधिंत तज्ञ अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात यावी व आयुष मंत्रालयाने सुचविल्या प्रमाणे उस्मानाबाद जिल्हयातील नागरिकांना अर्सेनिकम अल्बम-३० ही होमीओपॅथीक औषधी तातडीने नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात यावी अशा मागण्या केल्या आहेत
"जिल्ह्यातील कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता आरोग्य मंत्रीराजेश टोपे,वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख व राज्याच्याआरोग्य संचालिका डॉ.अर्चना पाटील यांच्याशी दूरध्वनीवर चर्चाकरून त्यांना जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत अवगत केलेअसून त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत तातडीनेआवश्यक ती उपाययोजना करण्याबाबत तसेच आरोग्य यंत्रणेतसुसूत्रता आणण्यासाठी लवकरच एक वरिष्ठ अधिकारीपाठवण्यात येईल असे आश्वस्त केले आहे."
- राणाजगजीतसिंह पाटील