उस्मानाबादेत पाणबुडी मोटार चोरणाऱ्या टोळीचा म्होरक्या जेरबंद

बारा पाणबुडी मोटारी हस्तगत 
 
s
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

उस्मानाबाद   -  उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून विहीर, पाझर तलाव, साठवण तलाव, ओढा,‌नदी व शेततळे येथे पाणी उपसण्यासाठी लावण्यात आलेल्या पाणीबुडी मोटारी चोरीस जात होत्या, अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाणबुडी मोटार चोरणाऱ्या टोळीचा म्होरक्या जेरबंद केले आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून  विहीर, पाझर तलाव, साठवण तलाव, ओढा,‌नदी व शेततळे या ठिकाणी पाणी उपसण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पाणबुडी मोटार अंधाराचा फायदा घेऊन चोरी करणारी टोळी सक्रिय झाले होती.  या मोटरी चोरुन त्याची विल्हेवाट लावित असल्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सतत पोलिस प्रशासनाकडे शेतकरी करीत होत. परंतू पाणबुडी मोटारी प्रमाणेच हे चोरटे देखील मोटारी चोरून गायब होत असल्यामुळे त्यांना पकडायचे कसे ? हे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले होते. 

मात्र  पोलिसांनी याचा छडा लावण्याचे मनावर घेऊन तपासाची चक्रे फिरविण्यास सुरुवात करताच तुळजापूर तालुक्यातील खडकी तांडा येथील कैलास गोपाल चव्हाण (वय - ४९) यास रंगेहात पकडून त्यास पॉलिसी प्रसाद देताच त्याने पोपटा प्रमाणे इतर गुन्ह्यांची देखील कबूली दिली आहे. तर त्याच्या ताब्यातून १२ पानबुडी मोटारी व त्या मोटारी चोरून नेण्यासाठी वापरण्यात येणारी फटफटी असा १ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा माल हस्तगत केला आहे. ही धडाकेबाज कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने दि. २५ मे रोजी केली आहे.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलिस ठाण्यात २६/२९२१ कलम ३७९ भादव गुन्ह्यातील चोरी गेलेली पानबुडी मोटार ९  हजार रुपये किंमत तसेच गुरनं ७०/२०२१ ३७९ भादवि गुन्ह्यातील चोरी गेलेली ६ सहा हजार रुपयाची पाणबुडी मोटार, तर गुरनं ७५/२०२१ कलम ३७९ भादवि पाणबुडी मोटार किंमत ४ हजार रुपये, गुरनं ७६/२०२१ ४ हजार रुपये किंमतीची पाणबुडी मोटार, तसेच गुरनं ७८/२०२१ कलम ३७९ भादवि ४ हजार रुपये किमतीची पाणबुडी मोटार, तर गुरनं ७९/२०२० कलम ३७९ भादवि मधील ५ हजार रुपये किंमतीची पाणबुडीची मोटार, गुरनं १४४/२०२० कलम ३७९ भादवि नुसार ९ हजार रुपयाची पाणबुडी मोटार, गुरण ७४/२०१५ कलम ३७९ भादवि नुसार १४ हजार रुपयाची पानबुडी मोटार, तसेच गुरनं ११/२०१७ कलम ३७९ भादविमधील ८ हजार ५०० रुपयाची पानबुडी मोटार वरील सर्व गुन्हे तामलवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेले आहेत. तर गुरनं १७०/२०२१ कलम 379 भादवि मधील १२ हजार रुपयांची पानबुडी मोटार (नळदुर्ग पोलिस ठाणे), तसेच गुरनं १६७/२०२१ कलम ३७९ भादवि मधील १८ हजार रुपयांची पानबुडी मोटार (तुळजापूर पोलिस ठाणे) असे बारा गुन्हे वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात पानबुडी मोटर चोरी प्रकरणी दाखल करण्यात आले होते.

 या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.डी. निलंगेकर यांच्या पथकाने तपासाची सूत्रे अतिवेगाने फिरवीत  पानबुडी मोटार चोरी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला पकडून गजाआड केले आहे. या पथकामध्ये पोलिस हवालदार काझी, साळुंके, पोलिस नायक दिपक लाव्हरे-पाटील, पोलिस कॉन्स्टेबल सावंत, अशोक ढगारे, ठाकूर वाहनचालक पोलीस कॉन्स्टेबल माने, चौरे यांचा समावेश आहे.


 

From around the web