स्वप्नभंग : उस्मानाबाद जिल्ह्यात एकच दिवसात एस. टी. बस सेवा बंद

 

स्वप्नभंग : उस्मानाबाद जिल्ह्यात एकच दिवसात एस. टी. बस सेवा बंद

उस्मानाबाद - जिल्ह्यातील  परंडा येथे आज कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने सोमवार पासून सुरु करण्यात आलेली  एस. टी. बस सेवा  केवळ एकच दिवसात बंद कऱण्यात आली आहे. त्यामुळे लाल परी पुन्हा रस्त्यावर ही बातमी फियास्को निघाली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या ३७ दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नव्हता, त्यामुळे हा जिल्हा ग्रीन झोन मध्ये होता. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी जिल्हा अंतर्गत  एस.टी. बस सेवा  सुरु करण्यास परवानगी दिली होती, त्यानुसार सोमवार पासून प्रत्येक डेपोतून काही बसही धावल्या होत्या, पण एस. टी. बसच्या आगमनाबरोबर कोरोनाचे आगमन झाल्यामुळे केवळ एक दिवसात एस. टी. बस बंद करण्यात आली आहे.त्यामुळे नागरिकांचा स्वप्नभंग झाला आहे.


सोमवारी एस. टी. बस सेवेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही, त्यात परंडा येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकारी  दीपा मुधोळ - मुंडे आपला निर्णय फिरवला आहे.

जिल्हाधिकारी यांचा आदेश पाहा 

स्वप्नभंग : उस्मानाबाद जिल्ह्यात एकच दिवसात एस. टी. बस सेवा बंद

From around the web