शनिवार दि. २२ ऑगस्ट रोजी जनता कर्फ्यू शिथिल
Fri, 21 Aug 2020
उस्मानाबाद - शनिवार दि. २२ ऑगस्ट रोजी श्री गणरायाचे आगमन होत आहे. त्यामुळे दर शनिवारी होणारा जनता कर्फ्यू शिथिल करण्यात आला आहे. तसा आदेश जिल्ह्धिकऱ्यानी काढला आहे.
कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर दर शनिवारी जनता कर्फ्यू सुरु आहे. मात्र नेमके शनिवारी श्री गणरायाचे आगमन होत आहे. नागरिकांना गणेशमूर्ती तसेच पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी शनिवार दि. २२ ऑगस्ट रोजी जनता कर्फ्यू शिथिल करावा, अशी अनेकांची मागणी होती.
प्रशासनाने ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे नागरिक उद्या शनिवारी घराबाहेर पडू शकतात. दरम्यान, पुढील शनिवारपासून दर शनिवारी जनता कर्फ्यू कायम राहील, असे आदेशात म्हटले आहे.
काय म्हटले आहे आदेशात ?