उस्मानाबादच्या विकास प्रश्नी राज्यपालांनी घातले लक्ष

 

प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे शिष्टमंडळाला आश्वासन..!

उस्मानाबादच्या विकास प्रश्नी राज्यपालांनी घातले लक्ष


उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्ह्याचे महत्वाचे असणारे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प,टेक्निकल टेक्सटाईल पार्क शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग ,मराठवाडा वॉटर ग्रीड व तेरणा आणि तुळजाभवानी साखर कारखाने चालू करणे या सर्व विषयांची अद्ययावत माहिती संबंधित विभागाकडून मागवून घेऊ व हे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी आपण व्यक्तीशः लक्ष देऊ असे आश्वासन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिली आहे.यावेळी आ.राणाजगजीतसिंह पाटील,माजी मंत्री आ.संभाजी निलंगेकर,आ.सुजितसिंह ठाकूर, आ.रमेश कराड उपस्थित होते.


उस्मानाबाद आकांक्षित जिल्हा असल्याने,जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकार कोट्यवधी रुपये खर्च करण्यास तयार आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती,सिंचनाची सुविधा,अत्याधुनिक आरोग्य सुविधा व दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प,टेक्निकल टेक्सटाईल पार्क शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग हे विषय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी न ठेवल्याने व केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केले नसल्याने रखडले असून जिल्ह्यातील महत्वाच्या विषयांबाबत  महाविकास आघाडी सरकारचे नकारात्मक धोरण असल्याने आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी राज्यपालांना हस्तक्षेप करून न्याय देण्याची विनंती केली होती.


राज्यपालांनी भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाला आज दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी भेटिसाठी वेळ दिली होती त्याअनुषंगाने आज आ.राणाजगजीतसिंह पाटील,माजी मंत्री आ.संभाजी निलंगेकर,आ.सुजितसिंह ठाकूर, आ.रमेश कराड यांनी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेऊन या विषयांबाबत मुख्यमंत्री व संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा करून देखील शासन स्तरावर याबाबत कसलीही हालचाल होताना दिसत नाही.सरकार कशा प्रकारे जिल्ह्याच्या महत्वाच्या प्रश्नांवर नकारात्मक भूमिका घेत आहे हे सांगितले.जवळपास अर्धा तास झालेल्या बैठकीत राज्यपाल महोदयांनी प्रत्येक विषय समजून घेतला.


बैठकीत सर्व विषयांबाबत एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करण्यात आले त्यात  कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचा नॅशनल इन्फ्रा पाईपलाईन योजनेमध्ये समावेश झाल्यास या योजनेसाठी केंद्राकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकतो.केंद्र सरकारने देशात ७५ वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसाठी २४ हजार कोटींची तरतूद केली आहे.यात ७५% पर्यंतचा निधी हा केंद्र सरकार देते.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात उस्मानाबाद चा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता.रेल्वे मार्गाच्या बाबतीत देखील केंद्र सरकारचे धोरण स्पष्ट असून राज्य सरकारने अर्धा हिस्सा उचलण्याचा निर्णय घेतल्यास केंद्र सरकार उर्वरीत ५०% खर्चाची तातडीने तरतूद करते.कौडगाव येथे टेक्निकल टेक्सटाईल पार्क स्थापण करण्यासह वरील सर्व विषयांबाबत राज्य सरकारला केवळ मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन प्रस्ताव केंद्राकडे पाठविणे एवढेच काम बाकी असल्याचे राज्यपाल महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.


उस्मानाबाद जिल्ह्याचे महत्वाचे असणारे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प,टेक्निकल टेक्सटाईल पार्क शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग ,मराठवाडा वॉटर ग्रीड व तेरणा आणि तुळजाभवानी साखर कारखाने चालू करणे या सर्व विषयांची अद्ययावत माहिती संबंधित विभागाकडून मागवून घेऊ व हे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी आपण व्यक्तीशः लक्ष देऊ असे आश्वासन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिली असल्याची माहिती आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली आहे.


From around the web