उस्मानाबाद : पत्रकार संघ भूखंड प्रकरण ... चौकशीचे चाक पुढे सरकले !

 उस्मानाबाद  : पत्रकार संघ भूखंड प्रकरण ...  चौकशीचे चाक पुढे सरकले !

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या आकाशवाणी जवळील भूखंड चौकशीचे चाक पुढे सरकले आहे. तहसीलदार गणेश माळी  यांनी, मंडळ अधिकाऱ्यास पत्र लिहून स्पॉट पंचनामा करून,  वस्तुस्थितीचा अहवाल देण्याचा आदेश काढला आहे. 

उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघास आंबेडकर पुळ्याजवळ इमारत असताना, सांजा रोडवर २० गुंठे भूखंड असताना परत आकाशवाणीजवळ शासनाकडून भूखंड लाटला होता,तरीही ११ वर्षे झाले तरी या भूखंडवर बांधकाम केले नव्हते. 

उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाची न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणी नसताना आणि एक इमारत आणि २० गुंठे भूखंड असताना शासनास खोटी माहिती देवून फसवणूक करून भूखंड लाटण्यात  आलेला आहे.   त्याची चौकशी करून आकाशवाणी जवळील भूखंड शासनाने परत घ्यावा, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते  बाळासाहेब सुभेदार यांनी, उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्याकडे केली होती. 

जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार आणि तहसीलदार यांनी मंडळ अधिकाऱ्यावर चौकशी सोपवली आहे.मंडळ अधिकारी आता स्पॉट पंचनामा करून अहवाल देणार आहेत, त्यानंतर त्यावर पुढे काय निर्णय होतो, याकडे लक्ष वेधले आहे. 

 उस्मानाबाद  : पत्रकार संघ भूखंड प्रकरण ...  चौकशीचे चाक पुढे सरकले !

 उस्मानाबाद  : पत्रकार संघ भूखंड प्रकरण ...  चौकशीचे चाक पुढे सरकले !

From around the web