उस्मानाबाद जिल्ह्यात मद्य विक्रीस परवानगी, पण...

 
उस्मानाबाद जिल्ह्यात मद्य विक्रीस परवानगी, पण...


उस्मानाबाद जिल्ह्यात मद्य ( दारू ) विक्रीस परवानगी देण्यात आली आहे, पण सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशीच सकाळी १० ते दुपारी १ या वेळेतच दारू विक्री करता येणार आहे.या आदेशामुळे दारू पिणाऱ्यास थोडासा दिलासा मिळाला आहे. 

उस्मानाबाद जिल्हा कोरोना मुक्त आणि ग्रीन झोन मध्ये आहे. आज ४ मे पासून मद्य ( दारू ) दुकाने वगळता अन्य दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु आता  मद्य (दारू) विक्री  दुकान तेही ठराविक दिवशी आणि ठराविक वेळेत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

दुकानासमोर पाच पेक्षा अधिक ग्राहक असू नये तसेच दोन ग्राहकामध्ये किमान ६ फूट अंतर असावे, अशी अटही घालण्यात आली आहे. हा परवाना फक्त घाऊक मद्य विक्रेत्यांसाठी आहे. 

From around the web