पंधराव्या वित्त आयोगाचा १० टक्के निधी सर्व पंचायत समितीला वाटप करा

 

पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रत्येकी १० टक्के विकासनिधी ४ महिन्यापासून खात्यावरच


 पंधराव्या वित्त आयोगाचा १० टक्के निधी सर्व पंचायत समितीला वाटप करा


उस्मानाबाद :  पंधराव्या वित्त आयोगाच्या योजनेमधून पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्यांना प्रत्येकी १० टक्के निधी खर्चाचे आर्थिक अधिकार महाराष्ट्र राज्य सरकारचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शासकीय अध्यादेश काढून जाहीर केले आणि त्याप्रमाणे जिल्हा परिषदेला बेसिक ग्रँटच्या (अनटाईड) हप्ता व दुसरा हप्ता देखील प्राप्त झालेला आहे. 


एकीकडे ग्रामपंचायतचा निधी वर्ग केला परंतु गत ४ महिन्यापासून पंचायत समितीला वाटप करून वर्ग न करता जिल्हा परिषदेच्याच खात्यावर पडून असल्याने हा दुजाभाव कशामुळे यामुळे पंचायत समिती सदस्यांच्या व जिल्हा परिषद सदस्यांच्या गणातील विकास कामांना खीळ बसत असल्यामुळे याबाबत महाराष्ट्र पंचायत समिती संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे तसेच महाराष्ट्र पंचायत समिती संघर्ष समितीचे मुख्य प्रवर्तक गजेंद्र राजेंद्र जाधव यांनी उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत दाताळ साहेब यांची भेट घेऊन निधी वाटप करण्याबाबत व कामांना मंजुरी देऊन निधी खर्चाबाबत चर्चा केली

तसेच येत्या काळात जिल्ह्यातील काही ग्रामपंचायत निवडणुका देखील असल्याने हा निधी खर्च करताना आचार संहितेच्या कचाट्यात देखील अडकू नये याकरिता लवकरात लवकर पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांच्या १० टक्के आर्थिक निधी वर्ग करून लवकरात लवकर खर्च करावा अशी मागणी सदस्यांमधून येत आहे.

आतापर्यंत प्राप्त निधीच्या पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांचा १० टक्के निधी इतर लातूर,कोल्हापूर,सातारा,पुणे,जालना जिल्ह्यामध्ये खर्च होत असताना उस्मानाबाद जिल्हा परिषदेला खर्च करण्याकरिता गट ४ महिन्यापासून मार्गदर्शक सूचना मिळाल्या नाहीत का असा प्रश्न देखील सदस्यांमधून जोर धरत आहे.


एकीकडे निधी नाही म्हणून महाराष्ट्रभर पंचायत समिती सदस्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी लढा दिला परंतु निधी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या उदासीनतेमुळे व व्याजाच्या रकमेपोटी सदर निधी पंचायत समितीला वर्ग करत नसल्याने उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत दाताळ साहेब यांची भेट घेऊन लवकरात लवकर निधी वर्ग करावा हि विनंती केली आहे परंतु येत्या आठवडा भरात पंचायत समितीला निधी वर्ग नाही झाल्यास सर्वपक्षीय लक्षवेधी आंदोलन जिल्हापरिषद समोर करू असे मत गजेंद्र राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केले.

- गजेंद्र राजेंद्र जाधव - पंचायत समिती सदस्य उस्मानाबाद


महाराष्ट्रभर पंचायत समिती सदस्यांचे संघटन उभा करून वेळोवेळी शासन दरबारी आंदोलने करून पंचायत समिती सदस्यांच्या लढ्याला यश मिळाले आहे परंतु निधी प्राप्त झालेला असताना पंचायत समितीला वाटप न करता जिल्हा परिषदेच्या खात्यावर ठेवल्याने ग्रामीण भागातील विकासाला आळा बसत आहे प्रत्येक पंचायत समितीच्या प्राप्त निधीच्या रकमेवर मिळालेली व्याजाची रक्कम देखील लवकरात लवकर वर्ग करून सदर निधीच्या कामांना मंजुरी देऊन निधी खर्च करावा असे मत दत्तात्रय शिंदे यांनी व्यक्त केले.

-दत्तात्रय शिंदे - पंचायत समिती सदस्य तुळजापूर


 पंधराव्या वित्त आयोगाचा १० टक्के निधी सर्व पंचायत समितीला वाटप करा


From around the web