मल्हार पाटील यांना कोरोनाची बाधा

 
मल्हार पाटील यांना कोरोनाची बाधाउस्मानाबाद - भाजपचे युवा नेते आणि आ. राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांना  कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर नवी मुंबईच्या तेरणा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

मल्हार पाटील यांनी फेसबुकवर स्वतःहून ही  माहिती दिली आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये  मल्हार पाटील यांनी म्हटले आहे की,  काल केलेल्या कोरोना चाचणी प्रमाणे माझा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या तेरणा हॉस्पिटल नवी मुंबई येथील  कोव्हीड सेंटर येथे दाखल झालो असून येथे उपचार घेत आहे.

आ.राणदादांच्या स्टाफ मधील 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर घरातील सर्वांची चाचणी केली असता आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने अहवाल निगेटीव्ह आले आहेत. माझी देखील तपासणी केली असून माझा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला आहे.

त्याचप्रमाणे माझ्या व माझ्या स्टाफच्या संपर्कात जे कोणी आले असतील त्यांना माझे आवाहन आहे की, त्यांनी देखील स्वतःची तपासणी करून घ्यावी, स्वत: ला होम कॉरंटाइन करून घ्यावे व वैद्यकीय सुचनांचे पालन करावे.

माझ्या प्रकृतीबाबत कोणतेही काळजीचे कारण नाही. आई तुळजाभवानी व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होईन!

I’ve been diagnosed with COVID-19, as per my reports received today. Requesting anyone who’s been in my contact recently to get themselves tested.

Posted by Malhar Patil on  Thursday, August 20, 2020

From around the web