एक शरद - महाराष्ट्र गारद : आ. सुजितसिंह ठाकूर
Jul 11, 2020, 21:55 IST
उस्मानाबाद - शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कधीच दोन अंकी खासदार आणि तीन अंकी आमदार निवडून आले नाहीत, जनतेने देवेंद्र फडणवीस सरकारच्या कामावरील विश्वासावरच कौल दिला होता, जनादेशाचा अनादर करून अनैसर्गिक सरकार जन्माला घातले, तेव्हा पवार यांनी आपल्या पक्षाचे पाहावे अन्य पक्षाचे प्रवक्तापद करू नये, अशी खरमरीत टीका भाजपचे राज्य सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी केली आहे.
सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत घेतली आहे. या मुलखतीचे हेडींग "एक शरद-सगळे गारद " असे दिले आहे. त्यावर आ. ठाकूर यांनी 'एक शरद - महाराष्ट्र गारद' अशी कोपरखळी मारली आहे.
पाहा म्हणाले, आ. सुजितसिंह ठाकूर