उस्मानाबादलाही आता स्वतंत्र विद्यापीठ ?

 

उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी समिती गठीत होणार 

 उस्मानाबादलाही आता स्वतंत्र विद्यापीठ ?

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र उस्मानाबादला कार्यरत आहे, मात्र आता स्वतंत्र  विद्यापीठ स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करता येईल का यासाठी एक अभ्यासगट म्हणून  सात सदस्यांची समिती गठीत करण्यात येईल. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संगितले.

आज मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील उपस्थित होते.

स्वतंत्र विद्यापीठाच्या निर्मीतीसाठी समितीचे गठन, माजी कुलगूरु आर.एन. माळी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तीन महिन्यामध्ये अहवाल देण्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदयजी सामंत यांनी गूरुवारी (दि.20) रोजी झालेल्या बैठकीत आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या स्वतंत्र विद्यापीठाच्या निर्मीतीच्या वाटचालीस आता खऱ्या अर्थाने सूरुवात झाली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याला स्वतंत्र विद्यापीठ असावे, अशी  मागणी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे- पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांच्याकडे बुधवारी (दि.19) रोजी केली. त्याअगोदर पर्यावरण व पर्यटन मंत्री तथा युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांची ख. ओमराजे आणि आमदार घाडगे-पाटील यांनी भेट घेतली होती. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदयजी सामंत यांना बैठक लावण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार श्री. सामंत यांनी गूरुवारीच या विषयावर सबंधित विभागाच्या प्रमुखासह जिल्ह्यातील महत्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक लावली. या बैठकीला उच्च तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, उपसचिव,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव, उच्च शिक्षण विभागाचे संचालक, विभागीय सहसंचालक यांच्यासह विशेष निमंत्रित म्हणुन खासदार ओमराजे आणि आमदार कैलास घाडगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ही बैठक व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन घेण्यात आली. 

या बैठकीमध्ये विद्यापीठाच्या निर्मीतीसाठी आवश्यक बाबीवर सविस्तर चर्चा करण्यात आली, यावेळी एका समितीचे गठण करण्यात आले आहे. या समितीने त्या भागातील सर्व घटकाची मते जाणुन घेऊन त्याचा अहवाल द्यायचा आहे. या समितीने पालक,विद्यार्थी सबंधित सर्वच घटक यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्याची तीव्रता लक्षात येणार असल्याचे बाब समोर आली आहे. 

या समितीमध्ये माजी कुलगूरु आर.एन.माळी यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी विद्यापीठाचे डी.टी शिर्के, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, माजी प्राचार्या सौ. डॉ.अनार साळुंखे, शिक्षणतज्ञ एम.डी. देशमुख, विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजय निंबाळकर, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.धनराज माने यांच्यासह औरंगाबाद व उस्मानाबाद दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या समितीचे सदस्य असणार आहेत. उस्मानाबादच्या शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत महत्वाची गरज पुर्ण होण्यासाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा करणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ते उस्मानाबाद जिल्ह्याचे अंतर अधिक आहे. या भौगोलिक दृष्टीने विचार करून विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी उस्मानाबाद उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करावे अशी अनेक वर्षांपासूनची  मागणी आहे. गठीत केलेल्या समितीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या अडचणी काय आहेत, या सर्व शैक्षणिक दृष्टीने अभ्यास करून तीन महिन्यांत आपला अहवाल शासनांकडे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.


From around the web