उस्मानाबाद : पाच गुन्ह्यातील आठ आरोपींना आर्थिक दंडाची शिक्षा 

 
उस्मानाबाद : पाच गुन्ह्यातील आठ आरोपींना आर्थिक दंडाची शिक्षा

उस्मानाबाद : प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी 26 मार्च रोजी उस्मानाबाद (ग्रा.) येथील 2 गुन्ह्यात शिक्षा सुनावल्या.

राम धोंडीबा बनसोडे, रा. चिखली, ता. उस्मानाबाद यांनी ॲपे मॅजीक वाहन क्र. एम.एच. 25 आर 5615 मध्ये ऊस भरून मानवी जिवीतास तसेच रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा रितीने सकनेवाडी शिवारातील रस्त्यावर वाहतूक करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याने 200 ₹ दंड व दंड न भरल्यास 3 दिवसाच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

भा.दं.सं. कलम- 325, 324, 323, 504, 34 चे उल्लंघन करुन मारहाण केल्या प्रकरणी एकाच कुटूंबातील 4 व्यक्तींना प्रत्येकी 10,000 ₹ दंडाच्या शिक्षेसह न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत न्यायालयात बसण्याची शिक्षा सुनावली आहे.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी 26 मार्च रोजी उस्मानाबाद (श.) येथील 3 गुन्ह्यात शिक्षा सुनावल्या.

            श्रीकांत अंबादास पवार, रा. उस्मानाबाद यांनी सार्वजनिक रस्त्यावरील हातगाड्यात मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा निष्काळजीपणे अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केल्याने त्यांना 300 ₹ दंड व दंड न भरल्यास 1 दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

            प्रविण सारंग जाधव व अजय संग्राम सपकाळ, दोघे रा. उस्मानाबाद यांनी कोविड- 19 च्या पर्श्वभुमीवर लोकसेवकाने जारी केलेल्या विविध मनाई आदेश झुगारुन भा.दं.सं. कलम- 188, 269 चे उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांना प्रत्येकी 500 ₹ दंड व दंड न भरल्यास 3 दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

From around the web