उस्मानाबाद जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १९.३२ टक्के 

गृह विलीगीकरण ( होम आयसोलेशन ) बंद
 
corona
कोरोना झाल्यास कोविड सेंटर मध्ये भरती व्हावे लागणार 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५३ हजार १८४ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ४७ हजार ८४१ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ११९६ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ४१४७ झाली आहे .

उस्मानाबाद जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १९.३२ असल्याने गृह विलीगीकरण ( होम आयसोलेशन )  बंद  करण्यात आले असून, कोरोना झाल्यास घरी उपचार न घेता कोविड सेंटर मध्ये भरती व्हावे लागणार आहे. 

जिल्ह्यातील ऑक्सिजनचे ९५४ पैकी २७४ म्हणजे ३० टक्के बेड रिकामे झाले होते तर ४५५९ पैकी ३०५८ म्हणजे ७० टक्के नॉर्मल बेड रिकामे झालेले आहेत. उपचाराखालील एकूण रुग्णसंख्या चार हजारांवर असली तरी प्रत्यक्षात रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दोन हजारांच्या आतच आहे.

 जिल्ह्यात प्रशासनाने सरकारी रुग्णालयासह खासगी कोविड रुग्णालये, सरकारी व खासगी कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण ५ हजार ७५९ बेडची सोय केली आहे. मोठ्या प्रमाणावर बेडची उपलब्धता असतानाही गंभीर रुग्णांसाठी बेडची कमतरता जाणवत होती. अशा परिस्थितीत अनेकांना वेळेत उपचार मिळाले नाहीत. आता मात्र परिस्थिती काही प्रमाणात सुधारत असून, ऑक्सिजनचा पुरवठाही समाधानकारक तर ऑक्सिजनचे बेडही पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत आहेत. 

From around the web