उस्मानाबाद जिल्ह्यात ४५ वर्षाच्या पुढील नागरीकांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस मिळणार 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात ४५ वर्षाच्या पुढील नागरीकांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस मिळणार

उस्मानाबाद -  जिल्ह्यात  १५ आणि १६ मे  रोजी लसीकरण मोहीम बंद राहणार आहे. कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस  देणेकरिता पहिला डोस  घेतल्यानंतर किमान १२ आठवड्याचे ( ८४ दिवस ) अंतर ठेवण्याबाबत भारत सरकारच्या सूचना प्राप्त झाल्याने हा  निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कळविले आहे. मात्र आता  जिल्हयामध्ये दि.१७ मे २०२१ रोजी ४५ वर्षाच्या वरील नागरीकांना तसेच आरोग्य कर्मचारी आणि फन्ट लाईन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. याकरीता जिल्हयामध्ये दिनांक १७ मे २०२१ रोजी प्रत्येक तालुक्यामध्ये एक लसीकरण केंद्र कार्यान्वीत असणार आहे. 

ज्या लाभार्थ्यांनी को विशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन किमान ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत म्हणजेच ज्यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस २२ फेब्रुवारी २०२१ पुर्वी घेतलेला आहे. केवळ अशाच लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. सध्या जिल्हयामध्ये असे एकुण २०८३ लाभार्थी आहेत. शक्यतो लाभार्थ्यांनी ज्या ठिकाणी लसीचा पहिला डोस घेतला होता तेथेच दुसरा डोस घेण्यासाठी गेल्यास गर्दी टाळणे सोईचे होणार आहे. 

लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधारकार्ड किंवा पहिला डोस घेतला त्यावेळेस नोंदवलेले ओळखपत्र सोबत बाळगावे जेणेकरुन दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. या दिवशी कोविशिल्ड लसीचा केवळ दुसरा डोस देय असणाऱ्या लाभार्थ्यांनाच लसीकरण केले जाणार असल्यामुळे या व्यतिरिक्त इतर नागरीकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करु नये.

लसीकरणाची वेळ सकाळी नऊ  वाजल्यापासुन सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत आहे. लसीकरण केंद्रावर एकुण दुसऱ्या डोससाठी देय असणाऱ्या लाभार्थ्यांच्या संख्येपेक्षा अधिक प्रमाणात लस उपलब्ध करण्यात आलेली आहे. ज्या लाभार्थ्यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन किमान ८४ दिवस पुर्ण झालेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांकरीता लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविडच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधीत ठेवत लस घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

४५ वर्षाच्या पुढील नागरीकांनाच दि.१७ मे रोजी मिळणार फक्त कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस - डॉ. मिटकरी 

 ४५ वर्षापुढील ज्या नागरिकांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले आहेत. फक्त असे नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाइन वर्कर यांनाच दि.१७ मे रोजी कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी दिली आहे. 


यासाठी दि. १७ मे रोजी प्रत्येक तालुक्यामध्ये एक लसीकरण केंद्र कार्यान्वीत केले असून ज्यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन किमान ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत. म्हणजेच  कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दि.२२ फेब्रुवारीपुर्वी घेतलेला आहे. फक्त अशांनाच  दुसरा डोस देण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे २ हजार ८३ लाभार्थी असून शक्यतो लाभार्थ्यांनी ज्या ठिकाणी लसीचा पहिला डोस घेतला होता. तेथेच दुसरा डोस घेण्यासाठी गेल्यास गर्दी टाळणे सोईचे होणार आहे.  लसीकरणासाठी जाताना आपले आधारकार्ड किंवा पहिला डोस घेतला त्यावेळेस नोंदवलेले ओळखपत्र सोबत बाळगावे. त्यामुळे दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. या लसीकरण केंद्रावर कोविशिल्ड लसीचा केवळ दुसरा डोस देण्यात येणार असल्यामुळे इतर नागरीकांनी विनाकारण लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करु नये‌ असे आवाहन त्यांनी केले आहे. 


तसेच लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्यापासुन सायंकाळी ५ वाजेपर्यंत असून लसीकरण केंद्रावर दुसऱ्या डोससाठी देय असणाऱ्या लाभार्थ्यांच्या संख्येपेक्षा अधिक प्रमाणात लस उपलब्ध करण्यात आलेली असल्यामुळे लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविडच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करीत, शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन डॉ. मिटकरी यांनी केले आहे.

From around the web