उस्मानाबाद जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी रेट राज्यात सर्वाधिक

जिल्ह्यात कोरोना रुग्ण का वाढत आहेत  ? 
 
उस्मानाबाद जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी रेट राज्यात सर्वाधिक

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार उडवला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २९ हजार ५५४ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी २२ हजार ९६६  रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ७२५  रुग्णाचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५८६३  झाली आहे. गेल्या पाच  दिवसात ८३  जणांचा मृत्यू  झाल्याने  घबराट पसरली आहे. 


उस्मानाबाद जिल्हयात टेस्ट केल्यापैकी सुमारे 40 टक्के रुग्ण येत  पॉझिटिव्ह आहेत.  पॉझिटिव्ह संसर्गाच्या फैलावाचा वेग रोखण्यास जिल्हा प्रशासनाला अपयश येत आहे.  राज्याच्या सरासरी पॉझिटिव्हीटी रेट पेक्षा जिल्ह्यात 15 टक्के अधिक आहे. उस्मानाबाद जिल्हयातील वाढलेला हाच पॉझिटिव्हीटी रेट लोकांसाठी जीवघेणा  ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

राज्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्हीटी रेट असणारे जिल्हे 
1)उस्मानाबाद-39.82
2) हिंगोली- 39.29
3) परभणी- 36.85 
4) नागपूर- 35.32 
5) पालघर- 34.49

राज्यात सर्वात कमी कोरोना पॉझिटिव्हीटी रेट असणारे जिल्हे
1) जळगाव -7.62 
2) यवतमाळ -8.85
3) धुळे -9.20
4) अमरावती 10.57
5) अकोला-10.91

का वाढत आहेत रुग्ण ? 

विनाकारण रस्त्यावर फिरणे, मास्क न वापरणे,सोशल डिस्टेंसिंग न ठेवणे , घरी आल्यानंतर हात न धुणे यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाची लक्षणे दिसू  लागल्यानंतर  बहुतांश जण होम क्वारंटाईन होत आहेत. त्यामुळे त्याचा संसर्ग घरातील अन्य लोकांना होत आहे. तसेच सर्दी, ताप , अंगदुखी सुरु झाल्यानंतर अनेकजण वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला न घेता  मेडिकल मधून गोळ्या आणून घरीच उपचार घेत आहेत. 

मागील वर्षी कोरोनाचा रुग्ण आढळला की , त्यास आरोग्य कर्मचारी उचलून नेवून दवाखान्यात नेत  होते, तसेच त्यास कोव्हीड सेंटर मध्ये ठेवले जात होते. त्यामुळे घरातील आणि परिसरातील लोकांना संसर्ग होत नव्हता. तसेच तो भाग सील केला जात होता. यंदा तसे होताना दिसत नाही. खूपच त्रास सुरु झाल्यानंतर काही जण दवाखान्यात भरती होत आहेत. भरती झाल्यानंतर अनेकांचा  २४ ते ४८ तासात  मृत्यू झाला आहे. 

जिल्हा रुग्णालयात बेड शिल्लक नाहीत. ऑक्सिजन तुटवडा झाला आहे. व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही, त्यामुळे मृत्यचे प्रमाण वाढले आहे. गेल्या पाच  दिवसात ८३  जणांचा मृत्यू  झाला आहे. २४ तासात किमान २० जणांचा मृत्यू होत आहे. 

पालकमंत्री गेले कुठे ? 

उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख २६ जानेवारीनंतर जिल्ह्यात फिरकले नाहीत. अधिकाऱ्यावर पालकमंत्र्यांचा वचक नाही. आरोग्य यंत्रणा ढिम्म झाली आहे. आठ दिवसाला आढावा मिटिंग होणे गरजेचे असताना, पालकमंत्री जिल्ह्यात येत नसल्याने लोकांत  संताप व्यक्त केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने पालकमंत्री बदलण्याची गरज आहे 

From around the web