उस्मानाबाद जिल्हयात सरासरी 66.97 टक्के मतदान
उस्मानाबाद - औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकसाठी उस्मानाबाद जिल्हयातील सर्वं 74 मतदान केंद्रांवर शांतेत आणि सुरळीत मतदान संपन्न झाले संध्याकाळी पाच वाजता मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली त्यानुसार जिल्हयातील 33 हजार 632 मतदारांपैकी 22 हजार 523 पदवीधरानी मतदानाचा हक्क बजावला . यामध्ये 18 हजार 667 पुरूष तर महिला 3 हजार 856 यांनी मतदान केले. शेवटी आलेल्या वृत्तानुसार 66.97 टक्के पदवीधरानी या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला.
जिल्हा प्रशासनाच्या कुशल नेतृत्तव व निरीक्षणा खाली ही निवडणूक प्रक्रिया संपूर्ण पणे शांततेत पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आले होते. GPS ट्रॅकिंगच्या माध्यमातून सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि त्यांना नेमून दिलेल्या वाहनाच्या लोकेशन आणि प्रवासावर निरीक्षण ठेवण्यात आले तसेच वेब कास्टिंग च्या सहाय्याने मतदान केंद्रावर बारकाईने लक्ष दिला गेला मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्याचे हेतूने सर्व मतदान केंद्रावर व्हिडिओ शूटिंग आणि वेब कास्टिंग व्दारे मतदान केंद्रावर निरीक्षण करण्यात आले. सर्व मतदान केंद्रांवर कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आवश्यक ती दक्षता घेण्यात आली. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य कर्मचारी मतदारांची थर्मल स्कॅनर द्वारे तपासणी करूनच प्रवेश मतदान केंद्रात प्रवेश देण्यात आला. यावेळी पोलीस बंदोबस्तही चोक ठेवण्यात आले होते.
या निवडणूक प्रक्रियेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पदवीधर मतदारांबरोबरच, कष्ट घेतलेले सर्व अधिकारी कर्मचारी आणि पोलीस फोर्स यांनी कौतुकास्पंद कामगिरी केल्या बद्यल जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कौस्तुभ दिेवेगावकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.