लसीकरण कार्यक्रमांतर्गत उस्मानाबाद जिल्हा राज्यात प्रथम

 
s

उस्मानाबाद -  राज्याच्या आरोग्य विभागांतर्गत कुटुंब कल्याण कार्यालय,पुणे यांच्यामार्फत माताबाल संगोपन आणि नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत विविध निर्देशांकांच्या कामाचे जिल्हा निहाय मुल्यमापन करुन जिल्हयांच्या गुणानुक्रम ठरविण्यात येतो.चालु वर्षात माहे सप्टेंबर 2021 अखेर झालेल्या कामाचा मुल्यमापन अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालातील गुणनुक्रमानुसार उस्मानाबाद जिल्हा हा राज्यामध्ये 83 गुण मिळवुन प्रथम क्रमांकावर आला आहे.

सध्या सर्वत्र कोविड-19 महामारीचा काळ असताना आणि कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दररोज कामकाज करत असताना जिल्हयातील सर्व आरोग्य संस्था आणि तेथील कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांनी माताबाल संगोपन आणि नियमीत लसीकरण कार्यक्रमांच्या विविध निर्देशांकामध्ये जसे की,माता आरोग्य कार्यक्रम,बाल आरोग्य कार्यक्रम,नियमित लसीकरण कार्यक्रम इत्यादी नॉन-कोविड कार्यक्रमात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंस्फुतीने दिलेल्या उद्दिष्टानुसार काम प्रमाणिपणे करत आहेत.या बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील,जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी आणि निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.सं.)डॉ.सचिन बोडके यांनी आरोग्य विभागांतर्गत जिल्हयातील सर्व अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांचे अभिनंदन करुन कामात सातत्य राखण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

From around the web