उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमा सील, आता प्रवासासाठी ई-पास लागेल

अशी करा नोंदणी
 
उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमा सील, आता प्रवासासाठी ई-पास लागेल

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार उस्मानाबाद जिल्याच्या सर्व आंतरजिल्हा व आंतरराज्य सीमा शुक्रवारपासून प्रवासासाठी बंद करण्यात आल्या असून, सर्व सीमांवर पोलिस तपासणी नाके कार्यरत करण्यात आले आहेत. या सीमा केवळ अत्यावश्यक कारणासाठी ओलांडता येतील.मात्र, त्यासाठी प्रवास पास बंधनकारक करण्यात आला आहे. ही ई- पास सुविधा महाराष्ट्र पोलीस दलाच्या https:/covid19.mhpolice.in/ संकेतस्थळावर, लिंकवर उपलब्ध आहे.

ज्यांना जिल्ह्याबाहेर किंवा जिल्ह्यात यायचे आहे, अशा गरजू अर्जदारांनी या लिंकवर जाऊन पाससाठी योग्य तो पर्याय निवडावा, असे आवाहन पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.

अशी करा नोंदणी

पोलिस दलाने दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्जदाराने आपले नाव व ओळखपत्र, पत्ता इ मेल आयडी, वाहन प्रकार व क्रमांक, प्रवासी संख्या,प्रवासाचो उद्देश,प्रवास प्रारंभ ठिकाण व प्रवासचे अंतिम ठिकाण, प्रवास मार्ग व दिनांक, परतीचा प्रवास मार्ग व दिनांक इत्यादी माहिती त्यात भरावी. तसेच अर्जदाराचे छायाचित्र व आवश्यक कागदपत्रे (प्रत्येकी १ mb आकाराच्या आतील) इत्यादी माहीती भरुन अपलोड करुन तसा ऑनलाईन अर्ज संबंधित जिल्हा पोलीस दलास करावा.

From around the web