उस्मानाबाद जिल्हा पुन्हा कोरोना मुक्तीकडे ...

उस्मानाबाद जिल्ह्यात केवळ २०६ ऍक्टिव्ह रुग्ण
 
उस्मानाबाद जिल्हा पुन्हा कोरोना मुक्तीकडे ...

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात  कोरोना रुग्णाची संख्या कमी आहे, जिल्हयात सध्या फक्त २०६ ऍक्टिव्ह रुग्ण उरले आहेत. तथापी  नागरिकांनी रुग्ण कमी झाले म्हणून हलगर्जीपणा करू नये,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यात रविवार दि. ६  डिसेंबर  रोजी नव्या ३०  रुग्णाची नोंद झाली तर ५२ जण बरे होवून घरी परतले. ही  नोंद फक्त शासकीय असून, खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाची नोंद नाही तसेच होम कॉरंटाईन झालेल्या रुग्णाची नोंद नाही.

 
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार ९१३  रुग्ण आढळून आले असून, पैकी १५ हजार १५४  रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या २०६  ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोनाने ५५३ जणांचा बळी घेतला आहे.

From around the web