उस्मानाबाद : अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार करणाऱ्यास 20 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

 
उस्मानाबाद :  अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार करणाऱ्या तरुणास  20 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 

एका अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार केल्या प्रकरणी तुळजापूर पो.ठा. येथे गु.र.क्र. 136 / 2019 हा दाखल गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक- योगेश खटाणे यांनी करुन आरोपी सोन्या मंगेश भोसले उर्फ आकाश, वय 21 वर्षे, रा. शेकापूर , ता. उस्मानाबाद याच्याविरुध्द् आरोपपत्र सादर केले होते.

या पोक्सो विशेष खटला क्र. 48 / 2019  ची सुनावणी उस्मानाबाद जिल्हा व सत्र न्यायालय क्र.- 1  श्रीमती रेश्मीता राय यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे अभियोक्ता  जयंत देशमुख यांनी आरोपीविरुध्दचे पुरावे व युक्तीवाद प्रभावीपणे मांडला. परिणामी आज दि. 24.08.2020 रोजी खटल्याचा निकाल जाहिर होउन न्यायालयाने नमूद आरोपीस भा.दं.स. कलम- 376 (3) सह पोक्सो कायदा कलम- 4 च्या उल्लंघनाबद्दल फौ.प्र.सं. कलम- 235 (2) अन्वये दोषी ठरवून 20 वर्षे सक्त मजुरीची व 10,000 ₹ दंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास 6 महिने वाढीव कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

यासोबतच  न्यायालयाने पिडीत पुन्रवसन योजनेतून पिडीत मुलीस 10,000 ₹ नुकसान भरपाई मंजुर केली असुन ती रक्कम तीच्या पालकांमार्फत तीला हस्तांतरीत केली जाणार आहे.

From around the web