उस्मानाबादेतून आंध्रप्रदेशात गेलेल्या विद्यार्थ्याला कोरोना

 
  उस्मानाबादहून सोलापुरात गेलेल्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू   


उस्मानाबादेतून आंध्रप्रदेशात गेलेल्या विद्यार्थ्याला कोरोना
  
उस्मानाबाद - उस्मानाबादेतून आंध्रप्रदेशात गेलेल्या एका विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली आहे तर लॉकडाऊनपूर्वी उस्मानाबादहून सोलापुरात गेलेल्या एका महिलेचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या कोरोना बाधित रुग्णाची संख्या चार आहे.   उस्मानाबादेत लॉकडाऊनपूर्वी परीक्षेच्या निमित्ताने आलेल्या व लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या आंध्रप्रदेश तसेच तेलंगणा राज्यातील विद्यार्थ्यांना ९ तारखेला प्रशासनामार्फत त्यांच्या गावी नेऊन सोडण्यात आले. मात्र, यापैकी आंध्र प्रदेशातील कडप्पा येथील एका २० वर्षीय विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याच्या सोबतच्या विद्यार्थ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आंध्र प्रदेश सरकारने ही माहिती उस्मानाबादच्या आरोग्य विभागाला कळविली. त्यानंतर यंत्रणेने विद्यार्थ्यांना ज्या भागात निवास व्यवस्था केली होती तेथील संपर्कात आलेल्यांचे स्वॅब घेतले आहेत. तसेच ज्या खासगी बसने विद्यार्थ्यांना आंध्रप्रदेशात सोडले त्या गाडीचालकाचे स्वॅब घेऊन त्यांना आयसोलेट करण्यात आले आहे.  


महिलेचा मृत्यू 

 लॉकडाऊनपूर्वी उस्मानाबादहून सोलापुरात गेलेल्या एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे  सदर महिला सुलतानपूर  येथील मूळ रहिवासी असून ती उस्मानाबादेत राहात होती . लॉकडाऊनपूर्वी ( १८ मार्च ) ती सोलापुरात नई जिंदगी येथे आपल्या नातेवाईकाकडे गेली होती. १२ मे रोजी तिला सिव्हिल  हॉस्पिटल, सोलापूर येथे गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. १२ मे रोजी तिचा सायंकाळी  मृत्यू   झाला होता. तिचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. 

धक्कादायक : कळंब तालुक्यातील तिघांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह

From around the web