महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन

 
fule

धाराशिव  - क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी आधुनिक समाजनिर्मीतीमध्ये अमुल्य योगदान दिले आहे. स्त्री शिक्षण, बहूजन शिक्षण तसेच ज्ञाननिर्मीती याकरीता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी महत्त्वाचे कार्य केलेले आहे.

           क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचा जन्मदिवस नागपूर येथील महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्थेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा करण्याचा मानस आहे. त्यानुसार दि. 08 ते 11 एप्रिल 2023 या कालावधीत जिल्हास्तरीय पुढील स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.

              महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील प्रसंगावर चित्रकला स्पर्धा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर निबंध स्पर्धा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील प्रसंगावर रांगोळी स्पर्धा येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये आयोजन करण्यात आले आहे.  

            महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन व विचारांवर वकृत्व स्पर्धा येथील श्री. व्यंकटेश महाजन वरिष्ठ विद्यालयात आयोजन करण्यात आले आहे.

           मी सावित्रीबाई बोलतेय किंवा मी ज्योतिबा बोलतोय या विषयांवर एकांकिका स्पर्धा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विध्यापीठ उपपरिसरातील नाट्यशास्त्र व लोककला विभागात आयोजन करण्यात आले आहे.

            स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकास रोख रक्कम पाच हजार रुपये तसेच प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, व्दितीय क्रमांकास रोख रक्कम तीन हजार रुपये तसेच प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास रोख रक्कम दोन हजार रुपये तसेच प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

             या स्पर्धेचे नियम व अटींकरिता तसेच नांव नोंदणीकरीता एस.डी.भोसले (चित्रकला स्पर्धा) 9421360991, एन.एम. गोरे (निबंध स्पर्धा) 9623714202, एस.डी. भोसले (रांगोळी स्पर्धा) 9421360991, डॉ. एस. व्ही. रसाळ (वक्तृत्व स्पर्धा), डॉ. गोविंद शिंदे 9561648464 (एकांकिका स्पर्धा) यांच्याशी संपर्क साधावा.

             इच्छुक स्पर्धकांनी त्यांची नांवे दि. ०8 एप्रिल २०२३ पर्यंत नोंदणी करावी तसेच स्पर्धेस येताना महाविद्यालयाचे ओळखपत्र व ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणावी. ओळखपत्राची छायांकित प्रत स्पर्धेच्या वेळेस आयोजकांकडे जमा करावी. स्पर्धेच्या निकालाचा अंतिम निर्णय हा परीक्षकांचा असेल व तो सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील. सर्व स्पर्धकांनी अटी व शर्तीचे पालन करणे आवश्यक आहे.

             तरी जिल्ह्यातील या स्पर्धांकरिता जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बी. जी. अरवत यांनी केले आहे.

From around the web