एसटी महामंडळात शिकाऊ उमेदवारांना संधी

 अर्ज ऑनलाईन स्वीकारणे सुरु
 
st osmanabad

उस्मानाबाद - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील शिकाऊ उमेदवार भरती 2021-22 करिता फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविले आहेत. दि 30 जून-2021 पर्यंत आय टी आय उत्तीर्ण उमेदवारांनी MIS वेब पोर्टलवरील  www.apprenticeshipindia.org या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन MSRTC Division Osmanabad या आस्थापनेत Establishment Code- E 03172700669 या करीता ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. 

      तसेच अभियांत्रिकी पदवीधर/ पदवीकाधारक उत्तीर्ण उमेदवारांनी NATS पोर्टलवरील www.mhrdnats.gov.in या वेबसाईटवरुन MSRTC OSMANABAD Division या आस्थापने (Establishment)करीता ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.रजिस्ट्रेशन केलेल्या अर्जाची प्रत व आयटीआय उत्तीर्ण संपूर्ण वर्षाचे शैक्षणिक कागदपत्रे 30 जून-2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळया जवळ,रा. प. विभागीय कार्यालय, उस्मानाबाद येथे जमा करावीत.कागदपत्रे जमा करण्यास येते वेळी फक्त उमदेवार किंवा त्यांचा एक प्रतिनिधी यांनी यावे कार्यालयात गर्दी करु नये.
 
      कोवीड-19 संबंधी सर्व नियमांचे पालन करावे. या कागदपत्रासोबत भरती प्रक्रिया शुल्क म्हणुन खुल्या प्रवर्गासाठी सहाशे रुपये व मागासवर्गीय उमेदवारांनी तीनशे रुपयांचा राष्ट्रीयकृत बँकेचा डिडी अथवा पोस्टल ऑर्डर MSRTC FUND ACCOUNT PAYABLE AT OSANABADयांचे नावे काढावा.अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.प्रशिक्षणार्थी भरती प्रक्रिया शुल्क इतर कोणत्याही स्वरुपात स्वीकारले जाणार नाहीत.डी.डी अथवा पोस्टल ऑर्डर च्या मागे उमेदवाराने त्याचे नाव व अर्ज केलेल्या पदाचे नाव लिहणे बंधनकारक आहे.मागासवर्गीय उमेदवाराने सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे.उमेदवाराने जमा केलेले भरती प्रक्रिया शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.प्रशिक्षणार्थी उमेदवाराचे आधारकार्ड बँकेत लिंक असणे आवश्यक आहे.

From around the web