उमरगा चौरस्त्यावरील लॉजमध्ये खुलेआम वेश्याव्यवसाय 

तीन ठिकाणी छापेमारी , ३० तरुण - तरुणी सापडले
 
s
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई 

उमरगा - चौरस्त्यावर असलेल्या काही  रेस्टॉरंट , लॉज अँड बियर बार मध्ये दारू बरोबर शारीरिक सुखासाठी बाईहि मिळत असल्याचे उघडकीस आले. या ठिकाणी राजरोस वेश्या व्यवसाय सुरु असताना, उमरगा पोलीस हप्ता घेऊन गप्प होते, परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीन ठिकाणी छापा मारून ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

उमरगा चौरस्ता अवैध धंद्याचा अड्डा बनला आहे. याठिकाणी मटका, जुगार खुलेआम सुरु आहेच पण जोडीला वेश्या व्यवसाय सुरु आहे. जुगारात  मिळालेले पैसे बाईवर उधळले जाते होते. तीन रेस्टॉरंट , लॉज अँड बियर बार मध्ये दारू बरोबर शारीरिक सुखासाठी बाई मिळत असताना उमरगा पोलीस डोळ्यावर काळी  पट्टी बांधून गप्प होते. 

ही  माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ३० जून रोजी भरदुपारी तीन रेस्टॉरंट , लॉज अँड बियर बारवर एकाच वेळी छापा मारला. यावेळी ३० हुन अधिक  तरुण, तरुणी सापडले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन उमरगा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. 

हॉटेल हर्ष , हॉटेल अभिराज आणि सुदर्शन लॉज वर पोलिसांनी हा छापा मारून ही  कारवाई केली. . या तिन्ही रेस्टॉरंट , लॉज अँड बियर बारचा परवाना रद्द करावा, अशी मागणी होत आहे. 

पोलीस अधीक्षक राजतीकल रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन घाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी  ही  कारवाई केली आहे. आरोपीविरुद्ध अनॆतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५९ सह  कलम ३४३ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 


थोडक्यात 

 दिनांक 30/06/2021 रोजी पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन   यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे उमरगा हद्दीतील हॉटेल अभिराज बार &रेस्टॉरंट & लॉज येथे चालत असलेल्या अनैतिक व्यवसाययावर छाप टाकुन खालील आरोपीन ताब्यात घेऊन पोलिस ठाणे उमरगा येथे गुरन 355/2021 कलम 3,4,5 अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1959 प्रमाने गुन्हा नोंद केला. 

आरोपी नामे 
1)अनिल व्यंकटराव  गुरव 2) सिधार्थ रमेश बद्रे 3)किरण लक्ष्मण ढगे 4)किरण रमेश ताकळे 5) सद्दाम कलीम सुबेकर 6)  विष्णु केशव पवार 7) अभिषक हनुमंत पाटील 8) शरद बाबुराव पवार 9) सुभाष गुत्तेदार (लॉज मालक फरार) 10) आकाश कोराळे (लॉज चालक फरार), असे एकुण 10 आरोपी /  वेश्या व्यवसाय करण्या-या 06 महिला  

  • मिळाला एकुण मुद्देमाल :- रोख रक्कम व मोबाइल व 15 कंडोम पॉकेट किंमत 1,06,220/- रुपये. 

 फिर्याद :- पोउपनि पी.व्ही.माने स्थागुशा, उस्मानाबद                           
 टिम :- पोनि . गजानन घाडगे, पोनि आघाव (पोस्टे उमरगा),
पोउपनि  माने 
पोना/1166 सय्यद
पोना / 1569 चव्हाण 
मपोना/1318 टेळे पोकॉ/1611 जधवर.पोकाॅ/ 1776 मरलापल्ले
पोकॉ/1819 आरसेवाड 
चा.पोना /645 कावरे

 उमरगा पो.ठा च्या हददीत उमरगा चौरस्ता नजीकच्या काही लॉजचे चालक आपल्या लॉजमध्ये काही महिलांदवारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पो.नि-गजानन घाडगे यांच्या पथकास मिळाली होती. यावर स्थागुशाचे पथक  व उमरगा   पो.नि- मुकुंद आघाव यांच्या  पथकाने  दिनांक 30.06.2021 रोजी  दुपारी चौरस्ता येथील लॉजेसची तपासणी सुरु केली.

 या वेळी हर्ष रिसॉर्ट  बार लॉजींग पाठीमागील खोल्यांमध्ये, सुदर्शन लॉज मधील खोल्यांमध्ये तसेच अभिराज लॉज ॲन्ड  बिअर बार मधील खोल्यांमध्ये  बंगाल येथील प्रौढ महीलांकरवी वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात असल्याचे आढळले. पोलीसांनी संबंधीत वेश्या महिलांची रवानगी महिला सुधारगृहात करुन संबंधीत लॉजचे चालक-गुडौला गौड, संजय बनसोडे, कुलदीप घंटे, गणेश कुटटी, सचिन गायकवाड, सुभाष गुत्तेदार यांसह 09 वेश्या  ग्राहक  अशा एकुण 15 पुरुषांविरुध्द  भादसं कलम 343 सह अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायदा कलम 3,4,5 अंतर्गत 3 गुन्हे नोंदवले आहेत

From around the web