चोरीच्या स्मार्टफोनसह एक आरोपी ताब्यात

 
Osmanabad police

उस्मानाबाद  -  स्था.गु.शा. चे पोनि- जानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि मनोज निलंगेकर, पोना- दिपक लाव्हरेपाटील, कावरे, पोकॉ- अशोक ढगारे यांच्या पथकास गोपनीय खबर मिळाली की धनेगाव, ता. तुळजापूर येथे राहणारा राहुल सुनील भोसले, वय 24 वर्षे हा चोरीचा स्मार्टफोन बाळगून आहे. यावरुन पथकाने त्यास काल 21 मे रोजी ताब्यात घेउन विचारपुस केली असता त्याच्या जवळील स्मार्टफोन हा बेंबळी पो.ठा. गु.र.क्र. 24 / 2021 भा.दं.सं. कलम- 379 या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे समजले. तो स्मार्टफोन त्याच्या ताब्यात कसा आला या विषयी विचारला तो टाळाटाळ करत असल्याने पथकाने नमूद स्मार्टफोन जप्त करुन आरोपीस पुढील कार्यवाहिस्तव बेंबळी पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

९ वर्षांपासून पाहिजे असलेला आरोपी ताब्यात

उस्मानाबाद -  पो.ठा. ढोकी गु.र.क्र. 70 / 2012 भा.दं.सं. कलम- 302, 201 या खूनाच्या गुन्ह्यातील  आरोपी- रमेश श्रीपती काळे, वय 51 वर्षे, रा. पारधी पिढी, पळसप, ता. उस्मानाबाद हा मागील 9 वर्षापासुन पोलीसांना पाहिजे होता. स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री पांडुरंग माने, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- आरसेवाड, जाधवर यांच्या पथकास तो गावी आल्याची गोपनीय माहिती मिळताच त्यास काल दि. 21.05.2021 रोजी शिताफीने ताब्यात घेउन पुढील कार्यवाहीस्तव पो.ठा. ढोकी पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

From around the web