७ जून रोजी ४५ वर्षाच्यावरील नागरिकांना मिळणार कोविशिल्ड लसीचा डोस 

 
s

उस्मानाबाद - जिल्ह्यातील  ४५ वर्षावरील नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाइन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस दि.७ जून रोजी दिला जाणार आहे. कोविशिल्ड लसीकरणासाठी ग्रामीण भागातील २४ निवडक आरोग्य उपकेंद्रामधून कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार असून २ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ६ ग्रामीण रुग्णालय, ४ उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद व पोलिस रुग्णालय उस्मानाबाद या ठिकाणी कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. 

लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड सोबत बाळगणे आवश्यक आहे. तर दि.७ जून रोजी केवळ ४५ वर्षावरील नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाइन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला जाणार असल्यामुळे इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये.

लसीकरण करण्यात येणारी २४ आरोग्य उपकेंद्र ग्रामीण भागात असून या आरोग्य केंद्राची नावे तालुकानिहाय पुढीलप्रमाणे - 

  • उस्मानाबाद - गोवर्धनवाडी, गौडगाव, चिलवडी, दारफळ व  कुमाळवाडी 
  • तुळजापूर - केशेगाव, अणदुर, चिंचोली व माळुंब्रा व  
  • उमरगा - औराद, हिपरगा रवा, कवठा व कोराळ 
  • लोहारा - कास्ती बुद्रुक व उदतपूर 
  • कळंब - वाकडी केज, भाटशिरपुरा, जायफळ व नायगाव (पाडोळी) 
  • वाशी - सारोळा मां, पिंपळगाव, कमलेश्‍वरी व गोजवाडा 
  • भूम - हाडोंग्री 
  •  परंडा - पिस्तमवाडी, चिंचपुर बुद्रुक व गोजवाडा 

या केंद्रावर प्रत्येकी २५० लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, वैराग रोड, उस्मानाबाद, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, रामनगर, उस्मानाबाद, पोलिस रुग्णालय, उस्मानाबाद,  ग्रामीण रुग्णालय मुरूम, ग्रामीण रुग्णालय लोहारा, ग्रामीण रुग्णालय सास्तूर, ग्रामीण रुग्णालय तेर, ग्रामीण रुग्णालय वाशी, ग्रामीण रुग्णालय भूम या लसीकरण केंद्रावर प्रत्येकी २५० लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, उपजिल्हा रुग्णालय कळंब, उपजिल्हा रुग्णालय परंडा, उपजिल्हा रुग्णालय उमरगा, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद व शासकीय जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद या लसीकरण केंद्रावर प्रत्येकी ३०० लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सदरील लसीकरणाची सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकूण ३९ लसीकरण केंद्र कार्यान्वित असणार आहेत.  लाभार्थ्यांना लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी अथवा बुकिंग करण्याची आवश्यकता नाही.  लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित लाभार्थ्यांपैकी प्रथम आलेल्या लाभार्थ्यांना ऑनस्पॉट नोंदणी पद्धतीने लसीकरण केले जाणार आहे. तर लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार असून यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत.

 या लसीकरण केंद्रावर फक्त कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा असे दोन्ही डोस दिले जाणार आहेत. त्यामुळे लसीकरणाच्या ठिकाणी दोन्ही डोसच्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र नोंदणी व रांगा ठेवण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर पालिका व पोलिस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणामध्ये मदत करावी. तर उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवीत लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही वडगावे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.

From around the web